
अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरास पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून नगरपरिषेकडून १५ ते १७ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचा भीषण सामना हा अक्कलकोटकरांना करावा लागत आहे. सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट शहरात टँकरद्वारे पाण्याची सोय नागरिकांना करून दिली आहे. यामुळे पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या अक्कलकुटातील नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे .
अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या कुरनूर धरणात अत्यल्प पाणीसाठा असून केवळ दहा ते पंधरा टक्के पाणीसाठा असल्याचे बोलले जात आहे. यावर्षी संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाच्या हंगामात पाऊस नसल्याने शेतकरी आणि नागरिक हे हवालदिल झाले आहेत. अक्कलकोट शहरासह ग्रामीण भागात दुष्काळामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत .अक्कलकोट शहर परिसरातील व ग्रामीण भागातील तलाव ,नदी , नाले , ओढे , पाझर तलाव , साठवण तलाव कोरडे पडले आहेत .भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करण्याची वेळ आली आहे. अक्कलकोट शहराला या पाणी टंचाईच्या झळा बसत असून नगरपरिषदकडून १५ ते १७ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिक हे चिंताग्रस्त झाले आहेत. पाणीटंचाईची चर्चा सर्वत्र सुरू आहे .पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या अक्कलकोट शहराला आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अक्कलकोट शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी जनतेची सेवा म्हणून पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील विविध भागातून पाणी टँकरद्वारे पाण्याची सोय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.



