सांस्कृतिक

श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग स्वामी यांची निवड

उपाध्यक्षपदी सुधाकर गायकवाड, घाळेप्पा पाटील यांची एकमताने निवड.
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
       येथील संजय नगर, हसापूर रोड वरील श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सव मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच श्री शक्तीदेवी सभागृहात पार पडली. मंडळाचे सुनील सिद्धे व विश्राम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सन २०२६ च्या नवरात्र महोत्सवासाठी नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
       यावेळी अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग स्वामी यांची तर उपाध्यक्षपदी सुधाकर गायकवाड व घाळेप्पा पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
        दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये
नवनिर्वाचित कार्यकारिणी खजिनदार  देविदास गोबरे, सचिव बाजीराव जाधव व वसंत बंडगर, सहसचिव सूर्यकांत बाचके,
आधारस्तंभ दत्तात्रय जाधव, अरुण लोणारी, संतोष पराणे, बाबाश्री सुरवसे, शरणप्पा पाटील, मुन्ना राठौर, प्रकाश कोळी, चंद्रकांत गवंडी, काशिनाथ धुमाळ, रविंद्र भंडारे, अप्पा शिंदे, मारुती टोणपे, भिमा कलाल, इरावती गायकवाड, शिवराज बिराजदार व रमेश बनसोडे या प्रमाणे आहेत, तर पूजा व आरती प्रमुख  ईरण्णा गवंडी, वैजनाथ मुकडे, राजू जाधव, सिद्धू माळी, अशोक टमके व समर्थ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. यावेळी नवरात्र महोत्सव भक्तिमय, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button