धार्मिक

आम्हा छ.संभाजी नगरकरांचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे तीर्थ स्थळ – आमदार केणेकर

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष- अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाने स्वामी भक्तांसाठी चौफेर प्रगती करीत असून, आम्हा छ.संभाजी नगरकरांचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे तीर्थ स्थळ असल्याचे मनोगत आमदार संजयकुमार केणेकर (वि.प.स.) छ. संभाजी नगर यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक, रेखीव, सुंदर अशी प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. 
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, पुरोहित संजय कुलकर्णी, दत्ता माने प्रवीण घाटगे, अतिश पवार, शहाजी यादव, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button