सामाजिक

वेतनश्रेणीच्या लढ्यासाठी अनु. जाती आश्रमशाळा संघटनेचा कर्मचाऱ्यांशी संवाद

 

नायगाव (:- सय्यद अजिम नरसीकर )वेतनश्रेणीच्या लढ्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाहू, फुले, आंबेडकर अनु. जाती आश्रमशाळा शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटना, कर्मचाऱ्यांशी संवाद दौरा सुरु केले आहेत. दि. ८ रोजी नांदेड जिल्ह्यातील ११ शाळेच्या कर्मचाऱ्यांनी नरसी जवळील लोहगाव येथे बैठकीचे करण्यात आले होते. राज्यातील गेल्या १५ वर्षांपासून अनुसूचित जाती च्या आश्रमशाळांना न्याय मिळत नाही. कर्मचारी मात्र अनेक वर्षांपासून विना वेतन काम आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संघटनेतील पदाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

शाहू फुले आंबेडकर १६५ अनुसूचित जातीच्या निवासी आश्रमशाळांना व्ही जे एन टी च्या आश्रमशाळेची शाळा संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणी नुसार १००% अनुदान देण्यात यावे अशी मागणी प्रलंबित आहे. शासन स्तरावर या मागण्यांची वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन वेतनश्रेणीचा लढा यशस्वी करण्याचा आवाहन यावेळी करण्यात आले. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे व उपाध्यक्ष अविनाश साखरे, विलास पवार, सचिव अतिक अन्सारी, कोषाध्यक्ष सी डी पाटील. राज्य सह समन्वयक बापूराव पवार, सहसचिव किरण बोरुडे.
सह उपसचिव संदीप खरसे, महिला राज्यसभासद पुष्पा नळगिरे यांच्या उपस्थित नांदेड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राजुरे, उपाध्यक्ष भास्कर मनूरकर, सचिव बिचू दस्तगीर व इतर सदस्य यांची निवड यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button