टॉप न्यूज

रमजान आत्मशुद्धीचा मार्ग

 

रमजान म्हणजे केवळ उपवास नसून तो आत्मशुद्धी, आत्मनियंत्रण, अल्लाहशी जवळीक, गरजूंना दानधर्म रमजानचा मुख्य उद्देश।

जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याची सुरुवात चंद्र दर्शन रोजे (उपवास) पासुन होते.

जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याची सुर्वात यंदाच्या वर्षी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री चंद्र दर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली.
२०२६ मधील पहिला रोजा १९ फेब्रुवारी रोजी होता विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचा रमजानचा पहिला रोजा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकाच दिवशी होती.
रमजान महिन्याचा (रोजा)उपासना मानवतेच्या सेवेचा रमजान सण इस्लाम धर्माच्या पाच मूलभूत स्तंभा पैकी एक आहे इस्लामचा पाया (१)ईमान २)नमाज (३)जकात (४)रोजा आणि (५)हज या पाच गोष्टीवर अवलंबून आहे.

इस्लाम धर्मातील १२ महिन्यातील १ महिना पवित्र रमजान हा महिना ईबादत, नमाज, रोजा, जकात, दानधर्म हे सर्व पवित्र कार्य रमजान मध्ये प्रत्येक मुसलमान करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून या महिन्याला पवित्र रमजान, वर्षभरातील पवित्र महिना मानला जातो.

( रोजा) उपवास म्हणजे, साधारणपणे पहाटे चार साडेचार दरम्यान उठणे दात घासणे आंघोळ करणे त्यानंतर जेवण बनवणे व घरातील सर्वजण एकत्र मिळून पहाटे (सहरी) जेवण करणे एकदा पहाटे केलेली सहारी म्हणजे जेवण पहाटे ५:०० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत अन्न, पाणी काहीच न घेता कडक उपवास करणे.

आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार १२ महिन्यातून किमान १५ दिवस कडक उपवास पाळल्यास शरीरातील विषाक्त पेशींचा नायनाट होतो.

 म्हणून मुस्लिम समाजात रमजान महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण महिन्याभराचे रोजे उपवास ठेवतात ३० दिवसाचे रोजे शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतात. शिवाय पचनसंस्थेस ३० दिवसांचा आराम मिळतो.

रमजान शब्दाचा अर्थ उष्ण आणि कोरडेपणा असा होतो रमजान ची सुरुवात प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात होत असते अनेक लहान चिमुकलेही या क डक उन्हामध्ये जीवनातील पहिला (रोजा) उपवास अल्ला प्रति श्रद्धा दाखवतात, या महिन्यात (रोजा)उपवासासोबत कुराण पठन करणे पुण्यकारक मानले जाते, म्हणून पहाटे फजरची नमाज नंतर किंवा दुपारी जोहर म्हणजेच १:३० च्या नमाज नंतर घरामध्ये मस्जिद मध्ये कुराण पठण करत बसतात.

 हजरत मोहम्मद पैगंबर यांनी एका हदिसमध्ये म्हटले आहे की जर एखाद्याने रमजानच्या महिन्यातील रमजानचा एक उपवास सोडला आणि त्याऐवजी आयुष्यभर रोजा उपवास केला तर त्याला रमजानच्या महिन्या इतकं महत्त्व नाही.

रमजान महिन्यात (रोजा) उपवास आणी तराबीची नमाज खूपच महत्वाच्या मानल्या जातात.

रमजान महिन्यात दररोज तराबीची सामुदायिक नमाज पठण केली जाते. रात्री ८:१५ वाजता अजान होते आणि ८:३० वाजता जमात उभारते म्हणजेच इशाची नमाज पठण केली जाते. ईशाची ४ रकात नमाज झाल्यावर, किमान एक तासभर तराबीची नमाज असते. यामध्ये कुराने हाफिज, म्हणजे ज्या व्यक्तीला संपूर्ण कुराण हीफ्ज आहे अर्थात कुरआन मुकपाठ आहे. ते हाफिजी तराबी नमाज मध्ये कुराण धर्मग्रंथाचे पठण करतात.
 रमजान सताविस्वा रोजा २७ व्या रोजा उपवास रोजी म्हणजेच रमजानच्या २७व्या रात्री शब-ए-कद्र रोजी पृथ्वीवर कुरआन अवतरले आहे.
२७ व्या रोजा रोजी म्हणजेच शब-ए-कद्र रोजी जगभरातील मुस्लिम बांधव शब-ए-कद्र ची नमाज (इशा ची नमाज)पडण्यासाठी देशभरातील संपूर्ण मस्जिद गचागच नमाज पठनासाठी भरलेली असतात, इशाची नमाज पठण झाल्यावर २० रखात तराबे नमाज अदा, करतात त्या व्यतिरिक्त सुन्नत,नफिल, नमाज पठण झाल्यावर मस्जिद मध्ये सलाम पठण करतात त्यानंतर फातेखानी करतात त्यानंतर मज्जिद मध्ये आलेल्या सर्वांना गोड पदार्थ म्हणजेच बुंदी जिलेबी मसाला दूध इत्यादी पदार्थाचा मस्जिद ट्रस्ट कडून आयोजन केले जातात, त्यानंतर अनेक मुस्लिम बांधव मस्जिद मध्येच बसून किंवा घरामध्ये जाऊन कुरान पठाण करतात व संपूर्ण रात्रभर इबादत दुवा प्रार्थना आपल्या स्वतःच्या घरच्यांसाठी, समाजासाठी,शेजारी,गल्लीतल्या,गावातल्या व संपूर्ण मानव जातीसाठी व देशाच्या प्रगतीसाठी बंधुत्वासाठी प्रेमासाठी,अल्लाहकडे प्रार्थना करतात.

आणि पवित्र अशा रमजान महिन्यांमध्ये दान-धर्म (जकात फित्रा) देणे याला रमजान मध्ये विशेष महत्त्व आहे.

 जकात कुणावर फर्ज(अनिवार्य) आहे.
जो मालदार है (पैसेवाला, श्रीमंत) त्याच्यावरती जकात फर्ज है, म्हणजे अनिवार्य आहे.जकात कुणाला देऊ शकतात,जकात सर्वात आदोगर पाहुण्यांवर हक्क आहे.म्हणजे जवळचा पाहुणा गरीब आहे दोन टाईम जेवण बनवण्याच्या साहित्य घेण्यासाठी पैसे नाही अशा आपल्या जवळच्या पाहुण्याना जकात देऊ शकतात.
त्यानंतर आपला शेजारी असलेला ज्याच्याकडे दोन वेळचा जेवण बनवण्यासाठी लागणारा साहित्य घेण्यासाठी ही पैसे नसतील आणि त्याचा दोन वेळचा जेवण करण्यासाठी चूल पेटत नसेल तर त्याला जकात देऊ शकता, त्यानंतर आपल्या गल्लीतील (मोहल्ला) असा घर ज्याच्या घरात पुरुष कमावणारा कोणी नाही त्याची घरची परिस्थिती हालाखीची आहे त्याला जकात देऊ शकतात, मग त्यानंतर आपल्या गावातील गरीब,मिस्किन,यतीम(अनाथ),माजूर(कर्जदार),मजबूर(गरजवंत),बेवा(विधवा), गरीब मरिज(दवाखान्यासाठी), एखाद्या गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांच्या(शैक्षणिक शिक्षणासाठी) सुद्धा आपन जकात देऊ शकतात.
 जकात देणे म्हणजे आपल्या जवळील मालमत्तेतून ठरवल्याप्रमाणे पैसा काढून गरिबांना वाटणे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम मुस्लिम व्यक्तीने आपल्या वार्षिक बचतीपैकी २.५% हिस्सा गरीब आणि गरजूंना देणे बंधनकारक आहे

(जानकी जकात)अर्थातच घरातील प्रत्येक माणसाच्या जीवाची जकात म्हणजे एका माणसामागे १.७५०ग्रॅम म्हणजेच पावणे दोन किलो गहू घरातल्या प्रत्येक माणूस लहान असो किंवा मोठा पावणे दोन किलो गहू देणे म्हणजेच जान की जकात हे बंधनकारक आहे.

(माल की जकात)अर्थातच आपल्या मालमत्तेतील विषाणू काढून संपत्ती निरोगी करणे असा मानला जातो.

जकात गोरगरीब गरजूंना दिली जाते श्रीमंता बरोबर गोर गरीबवर्गातील लोक सुद्धा रमजान महिन्याचा फायदा व ईद चा आनंद घेऊ शकतात.

जकात म्हणजे काय आणि कसे उदा:-समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहे.त्याला २५००रुपये जकात देणे अनिवार्य आहे.

 ज्या व्यक्तीकडे घरात साडे सात तोळे सोने आहे.आजच्या बाजार भावाने म्हणजे १५९,००० हजार रुपये तोळे भावाने साडे सात तोळ्याचे आजच्या बाजार भावाने साडे सात तोळे सोने असलेल्याना२९,८१२.५ हजार जकात अनिवार्य आहे.
किंवा
ज्या व्यक्तीकडे किंवा घरात ५९५ ग्रॅम किंवा (५२.५ साडेबावन तोळे) चांदी आहे किंवा वर्षभर त्या व्यक्तीकडे होती. ५९५ ग्रॅम चांदी म्हणजेच (५२.५ साडेबावन तोळे) चांदी आहे किंवा होती आजच्या बाजार भावाप्रमाणे म्हणजेच १४१,७५० रुपये २.५% रक्कम साडेबावनतोळे चांदीची रक्कम ३५४३.७५ हजार जकात अनिवार्यआहे.

भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, आजारी, गरजवंतांना मदत करावी, अशी कुरआनची शिकवण आहे.लोभ,व्याभिचार, अहंकार, अंधविश्वास आदींपासून दूर राहण्यास आणि अहिंसा, करूणा, शिक्षणाची संगत वाढविण्याची शिकवण दिली जाते. हा महिना वर्षभराचा मार्गदर्शक महिना आहे. त्यामुळे ईश्वराची कृपा व्हावी म्हणून कुरआन, नमाज पठण, रोजा केला जातो.

 अशा वेळी कुणीही उपाशीपोटी रोजा करणार नाही, याची काळजी घेतली जाते.

आपल्या शेजारी किंवा गल्लीतील शाळेतील विद्यार्थी अशा व्यक्तींना सहरीसाठी अन्न उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी असते.

चुकीच्या गोष्टी कानाने ऐकू नये, डोळ्यांनी वाईट पाहू नये, वाईट शब्द कोणाबद्दलही बोलू नये हाताने चांगले काम करावे एकंदरीत वाईट टाळून सत्य मार्गावर वाटचाल करण्याचे नाव रोजा आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात (कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नये) मन शुद्ध(स्वच्छ) ठेवावे लागते.

उपवास करताना कोणासाठी ही चुकीचे विचार मनात येऊ नये हाच पवित्र रोजा आहे.
या पवित्र अशा रमजान महिन्यात गोरगरिबांना गरजूंना,गरजवंतांना, शक्य तितकी मदत करावी याचाच नाव रोजा आहे.
रमजान हा सण म्हणजे आनंदाचा आणि बंधू भावाचा.
महिनाभर उपवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद येते इस्लाम धर्माचा ईद हा सर्वात मोठा सण आहे.
ईदची नमाज झाल्यावर एकमेकांना गळाभेट करून ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांच्या घरी जाऊन गोड पदार्थ सुरकुंबा पितात म्हणूनच रमजान ईदला गोड ईद असेही म्हणतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button