सामाजिक

अक्कलकोट शहरातील नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे – मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे आवाहन 

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहरातील नागरिकांनी रस्त्याला अडथळा होईल असे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा नगर परिषदेमार्फत कारवाई करून काढण्यात येईल असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
 अक्कलकोट शहरातील तूप चौकातील अतिक्रमण हे नगर परिषदेकडून बुधवारी काढण्यात आले यामध्ये जे गटारीवरील  ५० ते ५५ अतिक्रमण नगरपालिकेकडून काढण्यात आले. या अतिक्रमण मोहिमेमध्ये मुख्याधिकारी रमाकांत डाके व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. अक्कलकोट शहरातील रस्त्याला अडथळा आणणारे तसेच गटारीवरील अतिक्रमण प्रामुख्याने नगर परिषदेकडून करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अक्कलकोट शहरातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार असून वाहतुकीस अडथळा आणणारे अतिक्रमणे ही  काढण्यात येणार आहेत. मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्यात अतिक्रमण काढण्यात येणार आहेत. यामध्ये कारंजा चौक , बस स्थानक परिसर ,मेन रोड परिसर , श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमणे ही काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. या अतिक्रमण मोहिमेमध्ये उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
चौकट -अक्कलकोट नगर परिषदेमार्फत अक्कलकोट शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अक्कलकोट शहराच्या विकासासाठी स्तुत्य आहे .पण कारवाई करत असताना अक्कलकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण केलेल्या लोकांना अगोदर सांगणे गरजेचे आहे. पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. यामुळे ते स्वतःहून अतिक्रमण काढून घेतील आणि त्यांचे होणारे नुकसान टाळतील. अक्कलकोट नगर परिषदेने अक्कलकोट शहराच्या विकासासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे. तसेच आता  अक्कलकोट शहरातील छोट्या व्यवसायिकांना नाममात्र भाडेतत्वावर गाळे बांधून द्यावेत. यामुळे छोट्या व्यवसायिकाचें उदरनिर्वाह सुरु राहिल.
वसंत देडे, जिल्हाध्यक्ष भारतीय लहुजी सेना 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button