ई फाइलिंग प्रशिक्षण शिबिरास वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : – महाराष्ट्र जुडीशिअल अकॅडमीच्या वतीने वकिलांसाठी ई-फायलिंग प्रशिक्षण शिबिर जिल्हा नियोजन भवन सोलापूर या ठिकाणी आयोजित केले होते ,सदर प्रशिक्षणात अॅड किरण घाडगे यांनी अडवान्स ई फाइलिंग विथ पेपरलेस अँड इलेक्ट्रॉनिक डिजिटल इव्हिडन्स या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण दिले, कोर्टाचे कामकाज हे पेपरलेस करण्याच्या दृष्टिकोनातून ई-फायलिंग जिल्हा सत्र न्यायालयाने सक्तीचे केले आहे, त्यामुळे त्याची गरज ओळखून वकिलांना प्रशिक्षण देण्याचे दृष्टिकोनातून सदरचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते ,यावेळी व्यासपीठावर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड संतोष पाटील, उपाध्यक्ष अॅड परमानंद जवळकोटे, महिला उपाध्यक्ष अॅड शर्मिला देशमुख, सचिव अॅड.जयप्रकाश भंडारे, सहसचिवा अॅड.प्रियंका गोरंटी, खजिनदार अॅड सिद्धाराम पाटील उपस्थित होते.प्रारंभी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले व सदरचे प्रशिक्षण आयोजित करण्यामागचा हेतू विशद केला, त्यानंतर उपाध्यक्ष अॅड परमानंद जवळकोठे यांनी शिबिराचे प्रशिक्षक अॅड किरण घाडगे यांचा परिचय करून दिला, सदर प्रशिक्षणास वकिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सदरचे प्रशिक्षण हे सकाळी 10 ते संध्याकाळी पाच पर्यंत होते ,सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड.जयप्रकाश भंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिवा अॅड प्रियंका गोरंटी यांनी मांडले.





