धार्मिक
अन्नछत्र हे श्री स्वामी समर्थांच्या अखंड श्रद्धेचे महापर्व – माजी गृह मंत्री व आमदार अनिल देशमुख

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र हे श्री स्वामी समर्थांच्या अखंड श्रद्धेचे महा पर्व असल्याचे मनोगत राज्याचे माजी गृह मंत्री व काटोल नागपूरचे आमदार अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत विशाल कदम यांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला. यावेळी उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- अविनाश पवार, विश्वस्त भाऊ कापसे, सो.म.पा. माजी उपमहापौर- दिलीप भाऊ कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष – बंदेनवाज कोरबू आदिजण उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशांत साठे, अतिश पवार, प्रवीण घाटगे, निखील पाटील, योगेश कटारे, स्वामिनाथ बाबर, अमर मसरे, रोहन शिर्के, शहाजी यादव, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, संतोष माने, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, दत्ता मोरे, किरण साठे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.




