सामाजिक

लोककवी , लोकशाहीर वामनदादा कर्डक

अहो सांगा या वेड्याला, माझ्या घरधन्याला
कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला(चित्रपट सांगते ऐका )
अशी सुंदर लोकगीत रचणारे वामन तबाजी कर्डक यांची आज जयंती (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ – १५ मे, इ.स. २००४,) त्यांचा जन्म देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे झाला. ते एक मराठी लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते.ते डाव्या हाताने पेटी वाजवीत असत
सांगत्ये ऐका’ या चित्रपटाचा रौप्यमहोत्सव झाल्यावर दिग्दर्शक अनंत माने यांच्या डोक्‍यात एक कल्पना आली, की या चित्रपटात एक नवे गाणे टाकावे. त्यांनी ही कल्पना संगीतकार वसंत पवार यांना बोलून दाखवली. माने यांचा वसंत पवार यांच्या संगीतावर विश्‍वास होता. तशीच त्यांची साहित्यिक जाणही माहीत होती. त्यामुळे त्यांनी वसंत पवार यांनाच नवं गाणं निवडायचं स्वातंत्र्य दिलं. वसंत पवारांनी शाहीर वामनदादा कर्डक यांचं गीत निवडलं.
त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते .त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळया विकणे, टेंभुर्णीच्या पानाचे विडे करुन विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत.
आंबेडकर चळवळीचे अनुयायी असलेले लोककवी वामनदादा कर्डक हे वसंत पवारांचे (संगीतकार )मित्र होते. शाळा शिकण्याचे भाग्य नशिबी नसल्यामुळे ते अनेक वर्षे निरक्षर होते. समता दलात वामनदादा लेझीम व लाठीकाठी शिकवत.
मुंबईला बी.डी. चाळीत एक माणूस त्याला आलेले पत्र घेऊन दादांकडे आला व म्हणाला, “मास्तर एवढं पत्र वाचून दाखवा.’ वामनदादांनाच काय पण आजूबाजूच्या कुणालाच पत्र वाचता आलं नाही. त्यामुळे त्या माणसाच्या मनाची झालेली तगमग पाहून दादांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी साक्षर व्हायचं ठरवून त्यांचे अधिकारी देहलवीसाहेब यांच्याकडून जिद्दीने अक्षरओळख करून घेतली. पुढे दादांनी डॉ. आंबेडकरांचे विचार गाण्यांमधून सर्वांपर्यंत पोचवायचा विडा उचलून संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे जाऊन आपल्या आवाजाचा करिष्मा दाखवला.
कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी, इत्यादी व्यवसाय केले. त्यांना वाचनाचा छंद असून त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.
वामनदादा कर्डक यांनी ३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहिले व त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला..
त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीतरचना असल्याचा अंदाज आहे.
कर्डकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९४० साली नायगांव येथे पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले.त्यांनी अनेक आंबेडकरी चळवळीशी निगडीत काव्य रचना केल्या .
– योगेश शुक्ल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button