क्रिडा

अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न 

 अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून ३९ वर्षामध्ये अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये आता टर्फ क्रिकेट संस्कृतीची भर पडली आहे, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून न्यासाने अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीची उभारणी केली आहे, या मुळे ग्रामीण भागातील खेळाडूना प्रोत्साहन मिळेल आणि उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील असे गौरोदगार राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री, ना. भरतशेठ गोगावले, यांनी व्यक्त केले.
ते बुधवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट संचलित न्यासाच्या लगत असलेल्या जागेत अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी ना. भरतशेठ गोगावले बोलत होते. या कार्यक्रमास भारतीय, रणजी, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, निवडकर्ता हे उपस्थित होते.
दरम्यान अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी उदघाटन ना. भरतशेठ गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री, आमदार शेखर निकम, चिपळूण, आमदार, सचिन कल्याणशेट्टी, आमदार शिवाजीराव पाटील, माजी गृहराज्य मंत्री, सिद्धाराम म्हेत्रे,  नगराध्यक्ष, मिलन कल्याणशेट्टी,  न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, संदीप फुगे, भरत मित्र मंडळ, बाळासाहेब दाभेकर, पुणे यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि चंद्रकांत पंडित, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, समीर दिघे, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक,   संजय पाटील, सिलेक्टर, रणजी ट्रॉफी, मुंबई व मुंबई क्रिकेट असोसिएशन, TRDO चे चेअरमन, धर्मराज गोपाल सिंग, सिंगस स्पोर्ट्स, मुंबई, अॅड. नितीन हबीब, जेष्ठ विधिज्ञ व कायदे विषयक सल्लागार,  स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, ओंकारेश्वर उटगे, चार्टर्ड अकाऊंटंट, अरविंद शिंदे, योगेश अहंकारी, आर्कीटेक्ट, बालाजी सलगर अजिंक्यतारा टेन्साईल रुफ,पुणे, किरण पाटील, इंजिनिअर्स व कॉट्रॅक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 
या वेळी ना. गोगावले यांनी रायगडचा इतिहास व राजकारण याबात मनोगतातून विचार व्यक्त केले. या वेळी नामदार गोगावले यांनी श्री स्वामी समर्थांच्या श्री क्षेत्र अक्कलकोट चे प्रतिनिधीत्व करणारे सचिन कल्याणशेट्टी हे खरोखरच भाग्यवान आमदार असल्याचा गौरव करून त्यांच्याकडून सुरु असलेल्या विकास कामाचे कौतुक केले.
चौकट:
अॅकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूना संधी –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीमुळे अक्कलकोट सह ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या माध्यमातून आय.पी.एल., महाराष्ट्र, भारतासाठी या अॅकॅडमीच्या माध्यमातून खेळाडू मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो.
समीर दिघे-  भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, मुंबई 
चौकट : –
श्री क्षेत्र शेगाव नंतर श्री क्षेत्र अक्कलकोट येथे क्रिकेट अॅकॅडमी-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना संधी देण्याचे काम न्यास करीत आहे. या पूर्वी शेगाव येथे अश्याच अॅकॅडमीचे उद्घाटन करण्याचा योग आला होता. आता श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये अॅकॅडमीचे उद्घाटन करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे. पूर्वी अश्या अॅकॅडम्या ह्या मोठ्या महानगरामध्ये पाहायला मिळत होत्या, आता त्या अक्कलकोट शहरापर्यंत पोहचले आहेत. याचा फायदा तरुण खेळाडूने घ्यावेत. 
संजय पाटील – सिलेक्टर व रणजी ट्रॉफी, मुंबई 
समीर दिघे-  भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, मुंबई व संजय पाटील – सिलेक्टर व रणजी ट्रॉफी, मुंबई यांनी 
अॅकॅडमी व क्रिकेट विश्वाची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. 
न्यासाचे उपाध्यक्ष, अभय गुणधर खोबरे, सचिव, स्वामीराव मोरे, खजिनदार, लाला राठोड, विश्वस्त, राजेंद्र लिंबीतोटे, चंद्रकांत कापसे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, रामचंद्रराव घाटगे,  सर्व क्रियाशील सदस्य-सदस्या, सेवेकरी आणि कार्यकर्ते,  स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या सह चरणराज चौरे, संजय कोकाटे, आनंद तानवडे, रमेश बारसकर, पै. काकासाहेब पवार, पै. धनराज भुजबळ, महेंद्र गायकवाड, अमर पाटील, मनीष काळजे, संदीप खर्डीकर, संतोष बडवे, गिरीष कोल्हापुरे, प्रकाश सोनटक्के, राजू रंगर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, ताराबाई हांडे, आरतीताई लिंगायत, रविना राठोड, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, संदीप फुगे, अमर पाटील, रमेश बारसकर, रामचंद्रराव घाटगे, आनंद तानवडे, गणेश मोरे, मनीष काळजे, रमेश केत, योगेश गोविल, रमेश केत, धनंजय गाढवे,  शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, मल्लिकार्जुन बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, रमेश हेगडे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बाळासाहेब घाडगे, स्वामिनाथ बाबर, महांतेश स्वामी, असद फुलारी, राहुल इंडे  व त्यांची टीम यांच्यासह अमोलराजे लेझीम संघ व मित्र परिवार व समस्त विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते आदीजण मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. हे उपस्थित होते. 
या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर, सुबक, कोरीव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी पै. महेंद्र गायकवाड यांना रु. १ लाख व पै. काकासाहेब पवार यांना ५१ हजार रुपये तर. पै. धनराज भुजबळ यांना ५१ हजाराची देणगी यांना दिली. 
या अॅकॅडमीस क्रिकेटपटू-  सुनिल मालप,  चंद्रकांत रेंबुर्स,  किशोर बोरामणी,  उदय डोके, राजेंद्र गोटे,  संतोषजी बडवे,  अभिजित गुंड, सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
‘पूर्वी टर्फ म्हणजे फक्त छंद होता, पण आता तो ‘हेल्थ आणि वेलनेस’चा भाग झाला आहे. लोक आपल्या फिटनेसबाबत कमालीचे सजग झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच अगदी जम्मू, नॉर्थईस्ट आणि अगदी पोर्ट ब्लेअरमध्येही टर्फ संस्कृती जोराने फोफावली आहे. कोविडनंतर निर्माण झालेली आरोग्याची जागृती आणि बदललेली जीवनशैली यामुळे ‘टर्फ’ आता केवळ खेळाचे मैदान न राहता एक समृद्ध ‘क्रीडा इकोसिस्टम’ बनले असल्याचे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्लब मेंबर बोलताना सांगितले. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले तर आभार अरविंद शिंदे  यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button