धार्मिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ !

श्री गुरुपौर्णिमा व वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३९ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले. अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. राज्यसह, परराज्य, परदेशातून स्वामी भक्तांनी प्रचंड गर्दी केलेली होतील. अन्नछत्र परिसरात विविध ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे ३९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करुन नेत्रदीपक वाटचाल करीत आहे.
दरम्यान गुरूपौर्णिमे निमित्त सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा संपन्न झाले. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार शेखर निकम, आमदार शिवाजीराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, पुणे, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, भरत मित्र मंडळ पुणे संस्थापक अध्यक्ष- बाळासाहेब दाभेकर, सचिन सांबरेकर पालखी परिक्रमा संयोजक बेळगावी, ललिताताई वीर आगासखिंड नाशिक देणगीदार आदि मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
या विविध कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, ताराबाई हांडे, आरतीताई लिंगायत, रविना राठोड, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, संदीप फुगे, अमर पाटील, रमेश बारसकर, रामचंद्रराव घाटगे, आनंद तानवडे, गणेश मोरे, मनीष काळजे, रमेश केत, योगेश गोविल, धनंजय गाढवे, नागनाथ कुंभार, सिद्धाराम टाके, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, किशोर सिद्धे, अभियंता किरण पाटील, नागेश कलशेट्टी, रमेश केत, श्रीशैल कुंभार,यश विभुते,नितीन मोरे, रोहित मोरे , मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, प्रशांत साठे, अप्पा हंचाटे, अश्पाक काझी, रोहित खोबरे, बाळासाहेब जाधव, दिलीप ठोंबरे, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, रमेश हलसंगी, संतोष माने, गोटू माने, रोहन शिर्के , योगेश पवार, अप्पा हंचाटे, शुभम चव्हाण, केदार तोडकर, गोविंद शिंदे, योगेश कटारे, सुनिल कटारे , संजय गोंडाळ, अतिश शिंदे, सागर शिंदे, राजाराम पवार, व त्यांची टीम यांच्यासह अमोलराजे लेझीम संघ व मित्र परिवार व समस्त विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते आदीजण मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात असलेले यात्रीनिवास, यात्रीभुवन गेल्या दोन दिवसापासून हाऊसफुल्ल झालेले होते. मंडळाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाकरिता गर्दी झालेली होती. गेल्या १० दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, किर्तन या कार्यक्रमासह गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी महाप्रसाद भक्तांना वाटप होण्याकरिता नेटके नियोजन केलेले होते. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी तर व आभार सचिव शामराव मोरे यांनी मानले.
चौकट :
वर्षभरात ५ हजार भक्तांनी केले रक्तदान :
गेल्या ३६० दिवसात सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये वर्षभरात ५ हजार स्वामी भक्तांनी रक्तदान केले आहे.
चौकट :
चोख बंदोबस्त : –
श्री गुरु पौर्णिमा व ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व न्यासाच्या परिसरात लावण्यात आला होता.
चौकट :
न्यासाचे नेटके नियोजन : –
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्याने वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.
चौकट :
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ : –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सोय, भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीवर सुरू आहे. दररोज २५ हजार हून अधिक तर सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी व गुरुपोर्णिमेच्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला.
चौकट :
श्री क्षेत्र अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नांव सातासमुद्रापार : –
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिवदमन, उत्तराखंड, काश्मीर पंडित व दिल्ली याबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यासह विदेशातून लाखो भाविकांनी न्यासाचे ३९ वा. वर्धापनदिन व गुरुपोर्णिमेच्या निमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतेले. 
