सोलापूर
राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबेवाडी,करमाळा येथे “वृक्षारोपण”

एक झाड एक श्वास , एक संकल्प पर्यावरणाचा सन्मान
करमाळा ( प्रतिनिधी ).संजय (बापू )घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व पै.अशोक गोफने मनसे ता. उपाध्यक्ष यांच्या वतीने, अतिशय आनंद उत्सवातकार्यक्रम पार पडला..
कार्यक्रमासाठी खांबेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच .आदिनाथ शिंदे तसेच सदस्य दादासाहेब वायकुळे पोलीस पाटील.अनिल देवकते सामाजिक कार्यकर्ते .सुशील नरोटे, .अमोल वायकुळे, बालाजी गरड, अजय माने, मुन्ना टकले, विकी टकले, विशाल नरोटे, तसेच अंगणवाडी सेविका बानुबाई मोठे, स्वाती गोरे, माधुरी नरोटे व जि. प.प्रा. शाळा खांबेवाडी चे विद्यार्थी देखील आवर्जून उपस्थित होते.. आणि खांबेवाडी ग्रामस्थ देखील उपस्थिती लावली होती..



