सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दक्षिण तालुका पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्ज माफी ची मागणी….!

सोलापूर (रमेश सुरवसे): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ जून रोजी शेतकऱ्यांसाठी ची सरसकट कर्जमाफी करावी असे निवेदन नायब तहसीलदार विनायक कुलकर्णी यांच्याकडे सादर केले
शिष्टमंडळा द्वारे दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) पक्षानेम्हटले आहे की राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी जाहीर केलीअसून या योजनेतील जाचक अटी व शर्ती बघता ही योजना कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे तसेच राज्यातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत परिणामी संबंधित शासन निर्णय बदलण्याची आवश्यकता आहे सन२०१९ च्या कर्जमाफी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ पन्नास हजार रुपये पर्यंतच्या कर्जमाफीची अटरद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट २लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी अशा एकूण सात मागण्यांचानिवेदनात समावेश केला आहे
यावेळी शिष्ट मंडळात तालुकाध्यक्ष दत्तात्रय घोडके कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच प्रकाश पटणे परमेश्वर कोरे चिदानंद चिवडशेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते.



