Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ९ कोटी  ५०  लाखाचा निधी मंजूर; ग्रामीण भागातील रस्ते विकास कामांना गती

Admin by Admin
July 14, 2026
in सामाजिक
0
अक्कलकोट मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ९ कोटी  ५०  लाखाचा निधी मंजूर; ग्रामीण भागातील रस्ते विकास कामांना गती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट, ( प्रतिनिधी ) : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी  ३०५४ आणि  २४१९ या लेखाशीर्षातून ग्रामविकास खात्याकडून तब्बल ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध गावांतील रस्ते सुधारणा, दुरुस्ती व सी.डी. वर्कची कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रामविकास खात्याच्या ३०५४  आणि २४१९ लेखाशीर्षातून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या विकासासाठी हा निधी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.एकूण २१ कामांसाठी मंजूर निधीमुळे संबंधित रस्त्यांचे मजबुतीकरण, दुरुस्ती तसेच आवश्यक त्या ठिकाणी सी.डी.वर्कची कामे पूर्ण होणार असून ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद व सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने निधी उपलब्ध झाला आहे.या निधीमुळे ग्रामीण भागातील प्रलंबित रस्ते विकास कामांना गती मिळणार असून गावागावांतील संपर्क व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. शेतीमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही कामे उपयुक्त ठरणार आहेत. अक्कलकोट मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
मंजूर कामे व निधी (लाख रुपयांत) पुढीलप्रमाणे आहेत.
राज्य मार्ग ते अंबाबाई मंदिर, गोगाव ( ८० ), दर्शनाळ ते धोत्री ( ७५ ), चिंचोळी (न.) ते संजवाड ( १००), सुलेरजवळगे ते संजवाड ( १००), हालहळ्ळी (अ.) ते तीर्थ ( ७० ), मुळेगाव तांडा क्र. २ ते तांडा क्र. १ ( ६० ), मुस्ती ते भामला तांडा ( ४० ), धोत्री ते दर्शनाळ ( ७५ ), कुंभारी ते विनायक नगर ( २० ), माँसाहेब विडी घरकुल ते साखर कारखाना ( ३० ), 
दोड्याळ ते ब्यागेहळ्ळी सी.डी. वर्क व रस्ता दुरुस्ती ( ३० ), किणी ते दहिटणे सी.डी. वर्क व रस्ता दुरुस्ती ( ४० ), भोसगे ते तोरणी ( २० ), गोगाव ते पडसलगी ( २५ ), बादोला बु. ते वागदरी( २५ ),किणीवाडी–पालापूर–चुंगी–बोरगाव (दे.) मार्ग (२५ ), कलप्पावाडी ते जिल्हा मार्ग जोडणारा रस्ता ( २० ), गौडगाव खुर्द ते बोरी उमरगे ( ३५ ), कोळेकरवाडी ते सांगवी बु. ( २५ ), बणजगोळ ते चिकेहळ्ळी ( २५ ), नागणसुर स्टेशन ते मराठवाडी ( ३० ) आदी आहेत.
Previous Post

५० लाखांचा संशयित आयुर्वेदिक साठा जप्त; पुण्यात एफडीएची मोठी कारवाई

Next Post

मल्लिनाथ बंडगर यांचे अक्कलकोट काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड 

Admin

Admin

Next Post
मल्लिनाथ बंडगर यांचे अक्कलकोट काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड 

मल्लिनाथ बंडगर यांचे अक्कलकोट काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697