Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरण व अन्य प्रस्तावित महामार्गामुळे लोक सेवेतून स्वामीसेवेचे समाधान – ना. नितीन गडकरी

Admin by Admin
May 15, 2026
in सामाजिक
0
सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरण व अन्य प्रस्तावित महामार्गामुळे लोक सेवेतून स्वामीसेवेचे समाधान – ना. नितीन गडकरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )              विदर्भ व नागपुरात अनेक निस्सीम स्वामीभक्त आहेत.  सर्व स्वामी भक्तांप्रमाणे मी व माझे कुटुंबीयही स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आता केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री पदाची धुरा वाहताना रस्त्यांच्या माध्यमातून सर्व देश जोडण्याचे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेले आहे. त्या माध्यमातून सोलापूर ते अक्कलकोट या चौपदरी करणाच्या रस्त्याचे काम हाती घेऊन अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करून स्वामी दर्शनाकरिता अक्कलकोट ला येणाऱ्या भाविकांना सुखकर प्रवासाची सोय या चौपदरीकरणामुळे उपलब्ध झाल्याने
व अन्य प्रस्तावित महामार्गामुळे
लोकसेवेतून स्वामी सेवेचे मानसिक समाधान लाभले असल्याचे भावोद्गार देशाचे केंद्रीय व रस्ते वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी काढले.
        ते नुकतेच अक्कलकोटला येवून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ना.नितीन गडकरी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना ना.गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ना.गडकरी यांनी नागपूर मधील स्वामी धामच्या विविध नूतन उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ना.गडकरी स्वतः व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे या उभयतांच्या उपस्थिती बद्दलच्या आठवणींनाही उजाळा दिला. पुढे बोलताना गडकरींनी मी राज्याचा सार्वजनिक बांधकाममंत्री असताना माझ्या आई एकदा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाकरिता आल्या होत्या. त्या काळात प्रवासादरम्यान सोलापूर-अक्कलकोट – गाणगापूरचा रस्ता अत्यंत खराब असल्याने अक्कलकोटचा रस्ता चौपदरीकरण व नीटनेटका व्हावा अशी त्यांची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी माझ्या समोर व्यक्त केला होता, त्यामुळे सोलापूर-अक्कलकोट या चौपदरीकरण रस्त्यामुळे आईंचे स्वप्नही पुर्ण झाल्याचे समाधान असल्याचे मनोगत व्यक्त करून यापुढेही माझ्याकडून विविध माध्यमातून स्वामी सेवा घडत राहो अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, राज्यसभा खासदार .डॉ.ज्योतीताई वाघमारे, 
आमदार सचिन  कल्याणशेट्टी, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, 
प्रथमेश इंगळे, मोतीराम राठोड,  शिवशरण जोजन, नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, मंदिर समितीचे मंदार पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
Previous Post

सोलापूर जिल्ह्यात एक लाख कोटी रुपयांची रस्त्याची कामे पूर्ण करणार – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Next Post

अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतिकतेचे प्रतिक – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी 

Admin

Admin

Next Post
अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतिकतेचे प्रतिक – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी 

अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतिकतेचे प्रतिक - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697