Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतिकतेचे प्रतिक – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी 

Admin by Admin
May 15, 2026
in सामाजिक
0
अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतिकतेचे प्रतिक – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे उल्लेखनीय आणि धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा प्रचंड विस्तार होत आहे. अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतिकतेचे प्रतिक असल्याचे मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील ना. गडकरी यांना देण्यात आली. त्यांच्या समवेत खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, सो.मा.प. महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, ना. नितीन गडकरी यांचे स्विय सहायक बाळासाहेब ठेंग, मनोज वाडेकर, दिपक शिंदे, अमोल बिराजदार, एन.एच.ए. पुणे प्रकल्प संचालक संजय कदम, सोलापूर एन.एच.ए.चे स्वप्नील कासार, गुरुशांत धुत्तरगावकर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, दिपक वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, अक्कलकोट भाजपा मध्य मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील आदिजन उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.नितीन गडकरी यांनी म्हणाले की, गडकरी  कुटुंबीय आम्ही श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी भक्तच, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, हे स्वामींची अनुभूतीच आहे, व आमचे श्रध्देय स्थळ आहे. न्यासाच्या वतीने पर्यावरण पूर्वक वसुंधरेची जपणूक केली जात असल्याचे समाधान व्यक्त करून मंडळाकडून समर्थ महाप्रसाद सेवेची माहिती घेऊन न्यासाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 
चौकट :-
इलेक्ट्रिक बग्गीतून प्रवास –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी ना. नितीन गडकरी यांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आणण्यासाठी इलेक्ट्रिक बग्गीची सोय केलेली होती. दोन इलेक्ट्रिक बग्गीच्या माध्यमातून ना. गडकरी व त्यांच्या समवेत असणाऱ्या पदाधिकाऱ्याना अन्नछत्र मंडळात आणण्यात आले. ही सोय पाहून ना.नितीन गडकरी यांनी अन्नछत्र मंडळाच्या कार्याची कौतुक करून, पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास श्री स्वामी समर्थ नगरीतून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून, गरज ओळखून न्यासाने केलेल्या सोयी बाबत ना. गडकरी यांनी कौतुक केले.
याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे, मनोज निकम, पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण देशमुख, विजय माने, सुमित घाडगे, शुभम सावंत, प्रसाद मोरे, साहिल सय्यद, सागर जाधव, किरण साठे, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब पोळ, धानाप्पा उमदी, विनायक भोसले, नुर खासबागदार, स्वामिनाथ बाबर, मल्लिकार्जुन गवळी, बसवराज निंबाळे, विलासराव रेड्डी, बसवराज क्यार, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, सिद्धराम कल्याणी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने,  प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, तानाजी पाटील  यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरण व अन्य प्रस्तावित महामार्गामुळे लोक सेवेतून स्वामीसेवेचे समाधान – ना. नितीन गडकरी

Next Post

लोकशाहीर वामनदादा कर्डक 

Admin

Admin

Next Post
लोकशाहीर वामनदादा कर्डक 

लोकशाहीर वामनदादा कर्डक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697