सोलापूर
सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे गॅस टंचाईबद्दल अनोखे आंदोलन संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने गॅस टंचाई बद्दल अनोखे आंदोलन करण्यात आले. दिनांक ६ एप्रिल रोजी सदरचे आंदोलन सोलापूर येथे पार पडले. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करण्यात आला .अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे. दुकाने बंद पडत आहेत. गॅस सिलेंडर हे काळा बाजारात चार ते पाच हजार रुपयाला मिळत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आला. याप्रसंगी गॅस सिलेंडर साठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी , गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखा , २५ दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल ही अट शिथिल करा , काळाबाजार करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करा , वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करण्यात यावेत ,सरकारने प्रत्येक दोन किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न द्यावे , जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजने अंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले त्याचे ऑडिट करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर ढेपे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे , जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे , सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रवक्ते रवी पोटे , अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे , आशा आव्हाड ,विजयानंद उघडे , जालिंदर चंदनशिवे ,शरीफ शेख , सुरेश देशमुख , कमल चांगदेव सोनवणे , रमेश गायकवाड , राहुल शिंदे , विवेक गजशिवे , तुकाराम पारसे , वैभव भंडारे ,रवी सर्वगोड , विनोद कांबळे , उमेश शिंगाडे , गौतम बनसोडे , महादेव शिंदे , अमोल वाघमारे आदिसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




