सोलापूर

डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या अमृता पुजारीचां अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जनमेजयराजे भोसलेच्यां हस्ते सत्कार

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या अमृता पुजारी कोल्हापूर यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सोलापूर येथे करण्यात आला.
बोरामणी चे सुपुत्र पै. स्व. सिद्धेश्वर साखरे यांच्या स्मरणार्थ चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी कुस्त्या स्पर्धा नुकत्याच सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाल्या. या प्रसंगी चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या अमृता पुजारी कोल्हापूर चा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सोलापूर येथे करण्यात आला
याप्रसंगी संयोजक स्वाती साखरे-अळ्ळीमोरे, सागर कत्ते, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, शिरीष कुलकर्णी, जयंतराव सुभेदार, रमेश केत, पै. भरत मेकाले, पै. बजरंग मेकाले, पै.अप्पा साखरे, पै. उमेश सुळ, पै. मुन्नालाल शेख, पै. मौलाली शेख, सर्फराज शेख, महांतेश स्वामी, समर्थ चव्हाण यांच्या सह बहुसंख्येने कुस्तीगीर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button