महाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अभिनेते भरत जाधवाचां सत्कार

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
राज्यातील धार्मिक क्षेत्रात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने, संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आगळा-वेगळा ठसा उमटविले असून, स्वामी भक्त हा केंद्रस्थानी मानून, एकाच छता खाली विविध भक्ताभिमुख सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिसर हा पर्यावरण पूरक असल्याचे मनोगत प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुणे येथे प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांचा सत्कार जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना भरत जाधव हे बोलत होते.
या वेळी न्यासाचे विश्वस्त व महाराष्ट्र पालखी पादुका परिक्रमा मुख्य संयोजक- संतोष भोसले, जयंतराव सुभेदार, शिरीष कुलकर्णी पुणे, अश्पाकभाई काझी, महांतेश स्वामी, संतोष माने, असद फुलारी आदिजन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button