सोलापूर
मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये होणार

सोलापूर ( प्रतिनिधी ) – ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. एका दशकाहून अधिक काळ या संस्थेतर्फे बासरीचे अनेक विद्यार्थी तयार होऊन आपल्या कलेचा ठसा उमटवत सुविख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्या प्रयत्नांतून संस्थेतर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम होत असतात. सकाळचे विविध राग ठाणेकरांना ऐकायला मिळावे या उद्देशातून युनियन बँक ऑफ इंडियाच्या सहकाऱ्याने Mygurukul मोबाईल अँप च्या सहकार्याने ‘स्वरप्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आम्फिथिएटर, टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे येथे सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया शिष्यवृत्ती मिळविलेले कलाकार मास्टर व्येकटेशकुमार जाधव
जाधव घराण्याचे ५ व्या पिढीचे प्रचार प्रसारक
कु.मास्टर व्येकटेंशकुमार जाधव हे संगीतप्रेमी कुटुंबातील आहेत. गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव परतडू तर पंडित चिदानंद जाधव यांचे नातू आहेत.
सद्या तो सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ. १० वी मध्ये शालेय शिक्षण घेत आहे.
भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरल माध्यमातून संस्कृतीक स्तोत्र एवं प्रशिक्षण केंद्रचा दुर्मिळ वाद्या करिता भारतातून प्रथम फेलोशिफ अवॉर्ड प्राप्त..
आकाशवाणीने दूरदर्शन, भीमपलासी धारवाड, ८५ अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन गुलबर्गा, सुरसिगर संस्था मुंबई, बाल गंधर्व संगीत महोत्सव सोलापूर, संगीत संजे संगीत महोत्सव विजापूर माध्यमातून अनेक राज्यांत सादर केले. अकादमी भोपाळ, कलबुर्गी कल्याण कर्नाटक फेस्टिव्हल कर्नाटक,सगीत नाटक अकादेमी आयोजित वर्ल्ड म्युझिक डे फेस्टिव्हल दुर्मिळ समारोह नवी दिल्ली, सुंदरी सम्राट संगीत महोत्सव सोलापूर आणि भारतातील विविध राज्ये अनेक म्युझिक वर्कशॉप्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला आहे,
मास्टर व्यंकटेशकुमार जाधव आणि अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी होणारा असून त्यांना अथर्व कुलकर्णी तबला संगत करतील. त्यानंतर कलकत्ता स्थित रोजी दत्त पंडीत यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना सुप्रिया जोशी हार्मोनियम आणि पुष्कराज जोशी तबल्यावर साथ देणार आहेत. सदर कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांनी केले आहे.




