” भारतीय ज्ञान प्रणाली -माहिती आणि महती “या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे – शिक्षणशास्त्र प्रशाळा,शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न झाला.आज दिनांक 20 मार्च रोजी डॉ. दत्तात्रेय तापकीर यांच्या “*सुविचार प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं भारतीय ज्ञान प्रणाली -माहिती व महती या पुस्तकाचा प्रकाशन करण्यात आला”
.या कार्यक्रमासाठी मा. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, मा प्र -कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षणशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ.विलास आढाव व आंतर विद्या अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ संजय तांबट, शिक्षण शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख. प्रा.डॉ गीता शिंदे तसेच डॉ.अर्चना सुरेश गोसावी यांच्या सर्वांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सदर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. सुविचार प्रकाशनाच्या श्रीमती बनहट्टी यांनी ही प्रकाशनाची भूमिका सांगितली तर लेखकाच्या मनोगतात पुस्तकाचे लेखक डॉ. तापकीर यांनी भारतीय ज्ञान प्रणाली या पुस्तकाच्या लिखाणामागील कारणमीमांसा आणि भविष्यात हे पुस्तक विद्यार्थी शिक्षक, पालक, आणि संपूर्ण समाजाला कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल याबद्दल अतिशय सविस्तर विवेचन केले. शिक्षणशास्त्र विस्तार विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. गीता शिंदे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन केले.तर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ विलास आढाव यांनी केला. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक डॉ. नानकर डॉ. निर्मला तापकीर,डॉ. पौर्णिमा कदम,डॉ.गायत्री चौकडे, डॉ निशा वळवी डॉ.सारिका तोरवणे, हेमलता पाटील, प्राप्ती देवकाते, विभागातील विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



