श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय जातेगाव या प्रशालेत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा ( प्रतिनिधी )जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन महिला मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी जातेगाव च्या कर्तव्यदक्ष पोलीस पाटील स्मिताताई शिंदे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मनीषा माने, रेश्मा शिंदे राधा शिंदे शमीना तांबोळी व सोनाली सूर्यवंशी तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात महिलांचा सन्मान व सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला महिला पोलीस पाटील स्मिता शिंदे यांनी महिला विषयी व विद्यार्थिनी विषयी सुरक्षित कायदा व विविध योजनांची माहिती सांगितली आरोग्य सेविका शमीना तांबोळी यांनी महिलांच्या आरोग्य विषयाची घ्यावयाची काळजी व आहाराविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक शेख यांनी आत्तापर्यंत सामाजिक राजकीय व वैज्ञानिक क्षेत्रामध्ये केलेल्या महिलांविषयी माहिती सांगून त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याचे आव्हान विद्यार्थिनींना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक घुले यांनी केले तर वीर यांनी सर्वांचे आभार मानले.



