सामाजिक

“एक युग संपले, एक योद्धा गेला, एक प्रकाशस्तंभ विरला.”

 

डॉ.पतंगरावजी कदमसाहेब मजबूत आणि निर्भय योद्धा होते. समाजाच्या हितासाठी आयुष्यभर लढले.
साहेब प्रकाशस्तंभ होते समाजाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या निधनानंतर तो प्रकाशस्तंभ विरला.
9 मार्च 2026. साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

आई-वडिलांच्या तुटपुंज्या आर्थिक स्थितीमुळे गावापासून दूरच्या शहरात गेले.
रयत शिक्षण संस्थेचा एक माजी विद्यार्थी संस्थेच्या सातारा येथील शिवाजी महाविद्यालयात कमवा आणि शिका या (लेबर स्कीम) उपक्रमात सहभागी होऊन शिक्षण पूर्ण केले.
पुणे हडपसर येथील रयतच्याच साधना विद्यालयात शिक्षक म्हणून काम देखील केले. त्या वेळी साठ रुपये महिना वेतन मिळायचे.
कराड येथे कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या स्टोअर मध्ये वर्षभर लेखनिक म्हणून काम केले.
रिक्षाला द्यायला पैसे नसायचे, “जेमतेम जेवणाचे भागायचे; पण रहायला जागा कोठे? हायस्कूलच्या टेबलावर झोपूनही दिवस काढले.
पुण्यात असताना गावाकडून एकवेळ जेवणाचा डबा आला नाहीतर मी शिळी भाकरी चटणीबरोबर खायचे आणि दिवस घालवायचे.
कुंडलला शाळेला असताना गाडी चुकली म्हणून रात्रभर विट्याच्या पाण्याच्या टाकीवर झोपून रात्र काढली.
साहेब चौथीत असताना साडेचार रूपये फी होती. निम्मी फी माफ करा अशी विनंती करण्यासाठी किती हेलपाटे घालीत असे? सव्वादोन रुपये फी माफ झाल्याचा आनंद व्हायचा, त्याकाळात लाईट नव्हती कंदील नव्हते पण रॉकेलची चिमणी असायची त्या चिमणीखाली अभ्यास करायचे.
भारती विद्यापीठ टिळक रोडच्या बोळात सुरू झालं. शिपाई, क्लार्क, संस्थापक, सचिव, असं वन मॅन शो” होते.
कराड ओगलेवाडी कोयना सायडिंग मध्ये साधा क्लार्क ते भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचा कुलपती हा प्रवास होता.
सोनसळला असताना दिवसातून चार वेळा जेवायचे उठल्याबरोबर शिळी भाकरी आणि दही. बोर्डिंग मध्ये दिवसातून दोन वेळा जेवण मिळायचं तेही आमटी आणि भाकरी असायची,
किर्लोस्करवाडीला आयुष्यात पहिल्यांदाच लाईट बघीतली. सकाळी त्या कंपनीनं चहा-पाव दिला. हासुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.
वडीलांच्या भावांच्या बरोबर कुळव चालवणे, नांगराच्या मागे गडी म्हणून काम करणे, भांगलायला जाणे ही सर्व कामे केली होती. आणि शेतीबरोबरच घरातील सुद्धा कामे केली.
साहेबांची वाटचाल साधीसोपी सरळ कधीच नव्हती काटयाकुथ्यांचा रस्ता तुडवत संघर्ष केला. दगडधोंडे स्वत :च्या अंगावर घेतले.
साहेब रात्रंदिवस काम करीत होते. विश्रांती नव्हती. कामाच्या रगाड्यात तहान-भूकही विसरत, कोणत्याही हाटेलात शिरत, थोडं फार खात, पुनः कामाला जुंपून घेत होते.
आपली स्वप्ने सत्यात आणण्यासाठी झेप घेतली तीही तेवढीच उंच !
झेप ही आकाशी होती. आकाशाची उंच झेप घेताना मातीशीही नाते जपले.
“साहेबांनी जे पेरलं तेच उगवल छोटसं रोपट लावलं वाढवलं, कष्टाचा डोंगर उभा केला. आज त्याच रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला.” आयुष्यभराचे कर्तव्य मानून कठोर परिश्रम घेतले.

आपल्या दुष्काळी भागातील जनतेची सेवा करण्याचे कर्तव्य म्हणून काम केले, कष्टाशिवाय काहीच माहित नाही. म्हणून अविरत काम केले.
महाराष्ट्राच्या इतिहासात जरी साहेबांनी लहान वयातच केलेली कर्तुत्ववान काम आणि मिळालेल्या सर्व संधींचा पुरेपूर फायदा केला.
मोठ्या जिद्दीने सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राला अव्वल बनविण्याचे स्वप्न पाहून प्रगतीच्या वाटेवर चालत गेले.
साहेबांनी निर्माण केलेल्या संस्था योजना आणि कामगिरी करोडो महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात आणि घरात आजही आहेत!
आज आपण मान उंच करून जगत आहोत; महाराष्ट्राला नाविन्य प्रदान करत पलूस-कडेगाव मतदारसंघ महाराष्ट्रात उंच प्रगतीपथावर आहे!
आपल्या ध्येय प्रवासात पायांनी वाट बदलू नये; डोकं कोणापुढे कशासाठीही झुकू नये!
आजूबाजूला काय सुरू आहे. त्यापेक्षा आपण कुठुन कुठे आलो आहे.हे पहावे अस साहेब सांगायचे,

“पलूस-कडेगाव मतदारसंघाची खरी ढाल : पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या लोकांसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह नेता होते, ज्यांनी लोकांच्या हिताचे रक्षण केले.
एक असे नेता होते ज्यांनी सर्व पक्षांच्या लोकांना एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांना एकत्रित केले.
साहेबांनी दाखवलेल्या मार्गावर सर्व अनुयायी चालत आहेत.
“प्रामाणिकपणा, दिलदार स्वभाव मेहनत असेल तर जनता आपली पूजा करतात .
साहेबांनी आपल्या जीवनातून हा धडा शिकवला की प्रामाणिकपणा, दिलदारपणा कष्ट, मेहनत यामुळे जगात पूजनीय बनता येते.
“जनतेचे स्वप्न साकार करणारे नायक ज्यांनी जनतेच्या स्वप्नांना साकार केले आणि इतिहासात शिक्षणक्षेत्रातील नायक म्हणून ओळखले गेले.
पलूस-कडेगाव मतदारसंघात शिक्षण आणि स्वास्थ्य, सामाजिक सेवांचा विकास केला, ज्यामुळे तेथील लोकांचे जीवन सुधारले.

“समाज घडविण्यासाठी सर्वप्रथम खेडेगावातून उत्क्रांती झाली.
खेडेगावातूनच परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली.
ग्रामीण भागात लोकांच्यासाठी असलेल्या योजना यशस्वी केल्या, हा दृष्टिकोन मोठा व्यापक होता.
नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारले उद्याच्या भविष्याची बीजारोपण केले. विश्वासाची चाल दिली, जी आजही प्रकाशासारखी आहे.
ग्रामीण भागात बदलाचे वारे वाहत गेले. ज्यामुळे समाजात परिवर्तन झाले.
आजच्या तरुणांनी साहेबांची पुस्तके वाचली पाहिजे,
साहेबांच्या विचारांचा आणि अनुभवांचा लाभ घेण्यासाठी आजच्या तरुणांनी साहेबांचे आत्मचरित्र केलेली काम पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळेल /मिळण्याची गरज आहे, जेणेकरून ते साहेबांच्या आदर्शांवर चालून आपले जीवन यशस्वी करू शकतील.
साहेबांनी आपल्या राज्याला सामाजिक न्याय, स्वाभिमान, भाषा, धर्म, लोकशाही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रबळ शक्तींपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.

डॉ पतंगरावजी कदम साहेबांनी सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, शिक्षण, महिला विकास, आर्थिक विकास, आधुनिक तंत्रज्ञान लोकशाहीकरण यासारख्या जैविक तत्वांवर ठामपणे उभे राहून काम केले.
साहेबांनी सर्व विभागांमध्ये अग्रगण्य काम करून पलूस-कडेगाव मतदारसंघाला दरदोई उत्पादनात महाराष्ट्रात उच्च स्थानावर पोहोचवले.

डॉ पतंगरावजी कदमसाहेब यांच्या निधनाची खबर आमच्यासाठी एक मोठा आघात होता.
आमच्यासाठी एक मार्गदर्शक आणि प्रकाशस्तंभ होते, आणि त्यांची आठवण आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहील.
साहेबांची आठवण काळाच्या ओघातही कमी होणार नाही, तर लोकांच्या /आमच्या हृदयात कायम राहील.

“गावाचा अभिमान, ज्ञानाचा महामेरू: साहेबांच्या ज्ञान मंदिराचा पाया थोर महान विद्वान आणि खेडेगावच्या लोकांसाठी विवेकबुद्धीचे प्रतीक होते.
खेडेगावच्या लोकांसाठी काम केले आणि त्यांना दूषकाळमुक्त मतदारसंघ, शिक्षण, स्वास्थ्य, आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायी आहेत आणि त्यांच्या स्मृतीदिनीच नाही, तर रोज त्यांच्या विचारांना आत्मसात करून त्यानुसार जीवन जगले पाहिजे.
आपण साहेबांच्या शिक्षणाच्या विचारांना आत्मसात केले, तर आपले जीवन अधिक ज्ञानवर्धक आणि प्रगतीशील होईल.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांना आमचा सलाम आणि श्रद्धांजली.

डॉ पतंगरावजी कदमसाहेब यांनी अखेरचा श्वास ९ मार्च २०१८ साली निरोप घेतला.
गरीब सर्वसामान्य जनता, कामगार व शेतकरी हितासाठी ७४ वर्ष लोकसेवेसाठी उभा राहिले. प्रामाणिकपणा, पवित्रता, साधेपणा आणि राजकीय सभ्यतेचे दीपगृह. साहेबांनी दाखवलेल्या वाटेवर, विचारधारेबरोबर एकत्र प्रवास करूया!

 अरूण हिंदूराव सावंत भिकवडी खुर्द ता.कडेगांव जि सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button