महाराष्ट्र

परंडा येथील गायकवाड सर्जिकल & मॅटर्निटी हॅास्पीटल येथे अद्यावत वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यांचा लोकार्पण सोहळा 

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर परंडा येथील गायकवाड सर्जिकल & मॅटर्निटी हॅास्पीटल येथे दुर्बीणीद्वारे (Laproscopic) मशिन, Work Station अत्याधुनिक व्हेंटिलेटर सहीत भुल देण्याची मशीन, हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे C-Arm मशीन, प्रयोगशाळेत Mindry रक्त तपासणी मशीन, गरोदर स्त्रीयांसाठी बाळाचे हृदय तपासणीसाठी N.S.T. मशीन आणि अत्याधुनिक Konica Minolta चे X-Ray आदी अद्यावत वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यांचा लोकार्पण सोहळा बार्शी येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॅा.अमित पडवळ यांच्या हस्ते व भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.परंड्याचे सुपूत्र धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात भुलतज्ञ डॅा.सत्यनारायण गायकवाड यांनी त्यांचे सुपूत्र जनरल सर्जन व कॅन्सरतज्ञ डॅा.ओंकार गायकवाड व स्नुषा स्त्रीरोगतज्ञ डॅा.सौ.अमिता गायकवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षण घेऊनही मोठ्या शहराऐवजी परंड्यासारख्या ठिकाणी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून या भागातील रूग्णसेवेकरिता परंडा येथेच सेवा देण्याचे ठरविले. याबद्दल त्यांचे भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले.अशा अद्ययावत अनेक सुविधा परंड्यात प्रथमच उपलब्ध होणार असून रूग्णांना यापुढे मोठ्या शहरात जावे लागणार नाही. त्यामुळे रूग्णांवर तातडीने उपचार होऊन मोठा दिलासा आणि वेळेची व पैशांची मोठी बचत होणार आहे, असे माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button