सामाजिक

आई, वडील, संत हेच खरे आपल्या जीवनातील उत्तम मार्गदर्शक – राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
कर्माला माफी नाही, या कलियुगात माणूस संताशिवाय सुखी होणार नाही, या जगाला सुखी व्हायचं असेलतर, हरी नामा शिवाय पर्याय नांही,  मी पणा व अहंकार अंगिकारल्यामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. या पासून माणूस लांब राहिल्यास आनंद व समाधान मिळते, आई, वडील, संत हेच खरे आपल्या जीवनातील उत्तम मार्गदर्शक असून, या युगात माणसाला किंमत नसून पैशाला किंमत असल्याने माणसातला माणुसकीपणा हरवत चालला आहे. असे परखड मनोगत राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी व्यक्त केले. आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला अन्नछत्र मंडळातील कीर्तनास हाउसफुल्ल गर्दी झालेली होती. श्रोतेगण कीर्तन व प्रबोधनाने मंत्रमुग्ध झाले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शुक्रवारी राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांच्या ‘किर्तन’ कार्यक्रमाने ६ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर व न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज, व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवृत्ती महाराजांचे स्वीय सहायक ह.भ.प. रामायणाचार्य राजन महराज काशीद वैराग, ह.भ.प. रामेश्वर जाधव, ह.भ.प. भैरवनाथ महराज जाधव, पंढरपूर, ह.भ.प. नामदेव घावटे (मृदुंगाचार्य), गणेश पवार, पंढरपूर, मंगेश उपासे, माधवाचार्य महाराज वैष्णव मठ, सोलापूर हे उपस्थित होते.  
दरम्यान राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी शिल्पकार प्रशांत खेडकर पुणे यांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
न्यासाचे मुख्य  पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. या कीर्तनाला श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर व वैराग सोलापूर येथील वारकऱ्यांनी साथ दिली. यांच्या समवेत तालुक्यातील कोळेकरवाडी येथील ह.भ.प.चंद्रकांत डांगे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी आई-वडील, संत भगवंत या शिवाय माणसाचे जिवन शून्य असून, सध्याच्या विविध घडामोडीवर वृत्ती, वल्ली व कृती या बाबतचे कलियुगातील दाखले देत सडेतोड व परखड विचार व्यक्त करत भक्ती, शक्ती, धर्म-संस्कार प्रबोधन या त्रिवेणी संगमात लाख भक्तजनांना आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनभुती दिली. प्रचंड गर्दीमुळे न्यासाचा परिसरात ठिकठिकाणी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते.
चौकट : –
साता समुद्र पार :
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नछत्र हे मनोभावे सेवा करणारे संस्था आहे. या माध्यमातून धार्मिक कार्य बरोबरच अन्य उपक्रम देखील हे उल्लेखनीय रित्या राबविल्या जात आहेत. श्री क्षेत्र अक्कलकोटचे नांव श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने साता समुद्र पार केले. 
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई संदीप फुगे, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, संगीता राठोड, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, छाया पवार, सरोजनी मोरे, प्रिया निकम, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, हिरकणी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, लाला राठोड, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, दिलीप सिद्धे, नगरसेवक तम्मा मामा शेळके, राजाभाऊ निकम, मनोज निकम, अरविंद शिंदे, ओंकारेश्वर उटगे, सौरभ मोरे, प्रवीण देशमुख, वैभव मोरे, अतिश पवार, प्रवीण घाडगे, निखील पाटील, शिवराज स्वामी, सिद्धेश्वर मोरे, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, सर्फराज शेख, प्रशांत साठे, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, असद फुलारी, स्वामिनाथ गुरव, प्रभाकर मजगे, रोहित खोबरे, अश्पाक काझी, रोहित पाटील, राहुल भंडारे, अप्पा हंचाटे, अप्पू कलबुर्गी, आकाश शिंदे, रोहन शिर्के, स्वामिनाथ बाबर, प्रा. सायबण्णा जाधव, गोविंदराव शिंदे, धनप्पा उमदी, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, मल्लिकार्जुन बिराजदार, आकाश शिंदे, प्रसाद हुल्ले, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, मल्लिनाथ खुबा, किरण साठे, ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. श्रोत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे न्यासाच्या परिसरात एल.इ.डी. ची सोय करण्यात आलेली होती. त्या ठिकाणची सुद्धा जागा हाउसफुल्ल झालेली होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.  उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.
चौकट :
*शुभ संदेश -*
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा आणि ज्ञान, संस्कार तसेच मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा देणारा पवित्र उत्सव आहे. समाजात अध्यात्म, सेवा आणि मानवतेची भावना दृढ करण्यासाठी अशा उत्सवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला सेवा, श्रद्धा आणि लोककल्याणाचा संदेश समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहिला आहे. या पावन सोहळ्याच्या निमित्ताने समाजात बंधुभाव, सद्भावना आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधान नांदो, ही सदिच्छा व्यक्त करतो.
या कार्यक्रमास उदंड यश लाभो आणि तो समाजप्रबोधनास तसेच आध्यात्मिक मूल्यांच्या जतनासाठी प्रेरणादायी ठरो, ही शुभेच्छा.
ना.जयकुमार गोरे 
मंत्री ग्रामविकास व पालकमंत्री सोलापूर जिल्हा,
महाराष्ट्र  
चौकट :
भारतातले पहिले व्हेनेलेस्टर रेसिन मध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती असणार –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नियोजित ५ मजली महाप्रसादगृहावर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटी मूर्ती असणार आहे. श्री स्वामी समर्थांची मांडी घालून बसलेली मूर्ती व मूर्तीची उंची ५१ फुट, लांबी ५० फुट, रुंदी ५० फुट तर, मूर्तीचा रंग पांढरा असणार आहे. नियोजीत महाप्रसादगृहाची उंची ८० फुट, त्यावर स्वामींची ५१ फुटाची मूर्ती असणार आहे. असे एकूण १३१ फुट असून, भारतातले पहिले व्हेनेलेस्टर रेसिन मध्ये तयार केलेली व ५ मजली इमारतीवर बसलेली श्री स्वामींची मूर्ती असणार आहे. याचे काम पुणे येथील कार्यशाळेत सुरु आहे.  
प्रशांत खेडकर,
शिल्पकार, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button