शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो, कराटे, वूशू स्पर्धेत बावची विद्यालयचा पृथ्वीराज संतोष डाके धाराशिव जिल्ह्यात अव्वल

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )दि- १३ सप्टेंबर रोजी धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यालयाचा चा खेळाडू कु. पृथ्वीराज संतोष डाके इ 10वी च्या खेळाडूने तायक्वांदो, कराटे, वूशू या क्रीडा प्रकारामध्ये १७ वर्षीय गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याची लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशा बद्दल खेळाडूचा विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे यांनी सत्कार केला. या खेळाडूस क्रीडा प्रशिक्षक रामेश्वर चोबे , इम्रान काझी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयी खेळाडूचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तर या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



