सोलापूर

आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांचें श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी दहा कोटी ८४ लाख रुपयांचे दान 

 

गेल्या वर्षीपेक्षा यंदा झाले २ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न
पंढरपूर –
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी दहा कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
  यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुध्द प्रतिपदा (दि. २६ जून) ते आषाढ शुध्द पौर्णिमा (दि. १० जुलै) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण केले. २ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगी, ९ कोटी ४० लाख ४३ हजार ४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४ कोटी ५४ लाख १ हजार ४५८ रुपये भक्तनिवास, १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपये हुंडीपेटी, ३ कोटी २४ लाख ५ हजार ६८२ रूपये परिवार देवता तसेच २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये सोने- चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून १ कोटी २४ लाख ५ हजार ७५ रुपये व तीन इलेक्ट्रिक रिक्षा व बस चे ३२ लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७ कोटी ७० लाख ७ कोटी ७० लाख ६ हजार ६९४ रुपये अर्पण, २ कोटी ६९ लाख २२ हजार ५७८ रुपये देणगी, ९ कोटी ८५ लाख ३ हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, ५० लाख ६० हजार ४३७ रुपये भक्तनिवास, ९३ लाख ५५ हजार ७३ रुपये हुंडीपेटी, ३१ लाख ७९ हजार ६८ रूपये परिवार देवता तसेच २ कोटी २१ लाख ५३ हजार ६०१ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबती, चंदन खोड, चंदन पावडर, महावत्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून ६ लाख २८ हजार १०९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२४ च्या आषाढी यात्रेत ८ कोटी ४८ लाख ५८ हजार ५६० रुपये व या वर्षांच्या यात्रेत १० कोटी ८४ लाख ८ हजार ५३१ रुपये इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत २ कोटी ३४ लाख ४९ हजार ९७१ रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा- या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समि तीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button