दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद; करमाळ्यात तहसीलदारांना करमाळा बंदचे निवेदन

करमाळा- (प्रतिनिधी)
दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला करमाळा तालुक्यातील सामाजिक राजकीय व सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने पाठिंबा देत तसेच दिल्ली पोलिसांनी आंदोलनकरते विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना सुद्धा जाहीर पाठिंबा या दोन्ही बाबींचा विचार करून २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे त्याच अनुषंगाने करमळा बंदची ही हाक करमाळा तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष संघटना व सामाजिक संघटना यांच्या वतीने . करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे व पोलीस निरीक्षक रणजीत जी माने यांना निवेदन देण्यात आले.
करमाळा शहर व तालुक्यातील उपस्थित आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन सुरू सुरू होते , आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून लाठीचार्ज आंदोलकांवर केला याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे , विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांवर उपस्थित आंदोलकांच्या वतीने निवेदनातून करण्यात आला , या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होण्यासाठी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे या बंदमध्ये करमाळा शहर व तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बंद शांततेत आणि लोकशाही मार्गाने पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी सदरच्या निवेदनावर विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच वंचित बहुजन आघाडी च्या आव्हानाला सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी साथ दिली .
तसेच उपस्थित सर्व आंदोलनकर्त्यांच्या वतीने उद्या वार गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी ९ : ३० स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलनकर त्यांच्या वतीने करण्यात आले .
तसेच यावेळी करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनीही कायदा सुव्यवस्था यांचे पालन करून शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले .



