Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; प्रकाश आंबेडकरांचा आरएसएस वर घणाघाती हल्ला

Admin by Admin
February 8, 2026
in सामाजिक
0
तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; प्रकाश आंबेडकरांचा आरएसएस वर घणाघाती हल्ला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुंबई: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून आरएसएस (RSS) आणि तेलंगणा सरकारवर संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहे. 
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तेल्लापूर येथील महात्मा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा हल्ला केवळ एका पुतळ्यावर नसून तो सामाजिक समतेच्या विचारधारेवर झालेला हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
हा ‘मनुवादा’चा पुतळा पाडण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर
या घटनेवर संताप व्यक्त करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी यामागे आरएसएसचा हात असल्याचा म्हटले आहे. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा केवळ जोतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. आरएसएसला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो.
पुढे ते म्हणाले, आरएसएसला फक्त मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवर झालेला आघात आहे. या घटनेनंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना टॅग करत  विचारले की, तुमच्या राज्यात अशा घटना वारंवार का घडत आहेत? तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात?
प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे की, हा देश फुले, शाहू आणि आंबेडकरवादी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही. तसेच ‘आरएसएस मुर्दाबाद’ आणि ‘मनुवाद मुर्दाबाद’ अशा घोषणा देत त्यांनी आपला निषेध नोंदवला.
Previous Post

त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने  अभिवादन 

Next Post

सोलापूर झेडपीच्या अध्यक्ष शांभवी कल्याणशेट्टी होणार का ? अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात चर्चा

Admin

Admin

Next Post
सोलापूर झेडपीच्या अध्यक्ष शांभवी कल्याणशेट्टी होणार का ? अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात चर्चा

सोलापूर झेडपीच्या अध्यक्ष शांभवी कल्याणशेट्टी होणार का ? अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156472
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697