कुंभेफळ-परांडा रस्त्यावरील धोकादायक झाडांचा प्रश्न सुटला; तहसीलदारांच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे तोडली

अखेर कुभेफळ चे उपसरपंच फारूक शेख यांच्या प्रयत्नाला यश
परंडा / धाराशिव (फारूक शेख )
कुंभेफळ ते परांडा या रस्त्याच्या कडेला असलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी धोकादायक झाडे अखेर प्रशासनाकडून तोडण्यात आली आहेत. कुंभेफळ गावचे उपसरपंच फारूक शेख यांनी यासंदर्भात ३ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार, परांडा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
या तक्रारीची तातडीने दखल घेत तहसीलदारांनी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परांडा यांना सदर झाडे तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते. पावसाळ्यात किंवा वाऱ्यामुळे ही झाडे कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. तहसीलदारांचे आदेश प्राप्त होताच उप आभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करत रस्त्यावरील अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात आले .
या कारवाईमुळे प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, उपसरपंच फारूक शेख यांच्या पाठपुराव्यामुळे हा मार्ग आता सुरक्षित झाला आहे.
नागरीका कडून उप आभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कौतुक होत आहे .



