राजकीय
धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारानी भाजपाचे उमेदवार विजयी करावेत – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. धोत्रीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आम्ही बढाया मारत नाही काम करतो. आम्ही जनतेचे सेवक म्हणून निवडून येतो. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने स्थानिक विषयांवर राजकारण करत आहेत. कुंभारी गटातील उमेदवार श्रुती भोरगुंडे व धोत्री पंचायत समिती गणातील उमेदवार शिल्पा बिराजदार यांच्यामुळे या भागातील विकासासाठी चांगले नेतृत्व मिळाले आहे. या पुढील काळात धोत्रीच्या विकासासाठी पाच कोट्यातून निधी मिळणार आहे. धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारानी भाजपाचे उमेदवार विजयी करावेत असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
कुंभारी जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार श्रुती गेनसिद्ध भोरगुंडे व धोत्री पंचायत समिती गणातील भाजपाच्या उमेदवार शिल्पा महेश बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ धोत्री येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी सायंकाळी करण्यात आला .यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते. यावेळी कुंभारी जिल्हा जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार श्रुती भोरगुंडे व धोत्री पंचायत समिती गणातील उमेदवार शिल्पा बिराजदार , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच वैशाली पाटील , शिवानंद दरेकर , ईराप्पा पाटील , दयानंद बिराजदार , भीमाण्णा चौगुले , लक्ष्मण बिराजदार ,सैपन शेख , भिमशा पाटील ,योगीराज दहिटणे , नंदकुमार बिराजदार , दिलीप नंदनगे ,श्रीशैल मठपती , आप्पासाहेब बिराजदार ,महादेव पाटील , शिवशरण बिराजदार , शरणाप्पा पाटील , वीरपाक्षी घेरडे , अनिल रामपुरे , चन्नवीर होनमुरगे , सुरेंद्र बिराजदार , राजकुमार बिराजदार , मल्लू चिवडशेट्टी , रमजान मियावाले , धानप्पा दहिटणे , श्रीकांत बिराजदार , सुधीर चौगुले ‘ महादेव होटकर , आदि सह धोत्री , रामपूर , कर्देहळळी , कुंभारी , सिर्फनळी , वडगाव दर्गनहळळी येथील नागरिक महिलावर्ग मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




