सामाजिक
भाविकांसाठी वटवृक्ष मंदीरात स्वामी दर्शनाची व्यवस्था उत्कृष्ट पध्दतीची , श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मनोगत

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे. भाविकांसाठी वटवृक्ष मंदीरात स्वामी दर्शनाची व्यवस्था उत्कृष्ट पध्दतीची असल्याचे मनोगत पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग मंत्री तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ व्यक्त केले. त्यांनी गुरुवारी येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नियोजनानुसार तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या. पुढे बोलताना माधुरी मिसाळ यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत ही व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,
शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नन्नू कोरबू,
आदित्य पाटील, प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.



