अक्कलकोट येथे आमदार सचिन कल्याणशेट्टीच्यां हस्ते पत्रकाराचां सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) ६ जानेवारी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यां हस्ते अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या तसेच चॅनलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर, पत्रकार स्वामीराव गायकवाड ,पत्रकार नंदकुमार जगदाळे, मारुती बावडे, राजेश जगताप , चेतन जाधव ,योगेश कबाडे रविकांत धनशेट्टी , रमेश भंडारी ,शिवा याळवार ,अरविंद पाटील , प्रशांत भगरे , बसवराज बिराजदार, शिवलाल राठोड , यशवंत पाटील , महेश गायकवाड , शिवानंद गोगाव , कमलाकर सोनकांबळे , गौतम बाळशंकर, सोमशेखर जमशेट्टी , प्रविण देशमुख , अभिजीत पत्की आदीचां आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विविध पत्रकारांना शाल, पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सन्मान केला.याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले , अक्कलकोट शहर व तालुक्यातील पत्रकार हे सातत्याने विकासात्मक बातम्या देऊन सहकार्य करत असतात.पत्रकारांच्या विविध विषयांमधील लेखनामुळे जनतेच्या समस्यांशी माहिती होते. अक्कलकोट शहर व तालुक्यातील पत्रकार हे नेहमीच सकारात्मकता बाळगतात.या ठिकाणच्या पत्रकारांचे काम हे सरस आहे. पत्रकाराच्यां आवास योजनेसाठी सहकार्य करू असे आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले.



