महाराष्ट्र
हिंदू धर्म हा हिंदू धर्म नाही तर ब्राह्मण धर्म आहे – वामन मेश्राम

पुणे –
आरएसएस आणि त्यांच्या संलग्न संघटना ब्राह्मण धर्माचा प्रचार हिंदू धर्म म्हणून करत आहेत आणि या प्रचाराला बहुजन समाजतील लोक बळी पडत आहेत. दरम्यान आता भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आरएसएस आणि त्यांच्या संघटनांची पोल उघड केली आहे. हिंदू धर्म हा हिंदू धर्म नाही तर ब्राह्मण धर्म आहे, असा पर्दाफाश वामन मेश्राम यांनी गुरूवारी केला. ते भीमा कोरेगांव येथे अभिवादन सभेत बोलत होते.
वामन मेश्राम पुढे म्हणाले कि ज्या लोकांकडे ऐतिहासिक समजदारी नाही ते लोक भीमा कोरोगावच्या लढाईला शौर्य दिवस म्हणत असतात. मात्र हा शौय दिवस नाही. शौर्य दिवस जर आम्ही मान्य केला तर जे पराभूत झाले, त्यांनी देखील शौय दाखवले आहे. ते लढता लढता मरण पावले, याचा अर्थ असा कि ते सुद्धा शौर्य दाखवत होते. भीमा कोरेगावच्या लढाईत जे लोक लढता लढता मरण पावले ते हा दिवस साजरा करण्यासाठी कि विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत नाहीत. त्यांनी यासाठी आले पाहिजे कि ते लढता लढता मरण पावले. परंतू ते असा कोणताही कार्यक्रम करत नाहीत. आम्ही मात्र दरवर्षी हा कार्यक्रम करतो.
आमच्या लोकांनी भीमा कोरेगावची लढाई लढून जिंकली. हा विजयाचा ईतिहास आहे. हा इतिहास विजयाचा नसता तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर देखिल येथे मानवंदना देण्यासाठी आले नसते. जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर देखिल येथे मानवंदना देण्यासाठी येत होते. याचा अर्थ असा कि निश्चिपणे यात एक मोठा संदेश आहे. जो आमच्या लोकांना देण्यायोग्य आहे. तो संदेश असा आहे कि आमच्या पूर्वजांनी ही लढून जिंकली. यामागे असा उद्देश्य होता कि जे पेशवे ब्राह्मण आमच्या लोकांच्या कमरेला झाडू आणि तोंडाला गाडगं लावण्यास भाग पाडत होते. पेशव्यांची दुसर्या राज्यातही सत्ता होती. मात्र तेथे असा प्रकार होत नसल्याचा कोणताही इतिहास उपलद्ध नाही.
वामन मेश्राम म्हणाले कि एकीकडे जातीची समस्या आहे तर दुसरीकडे जातीच्या उच्च निचतेचा भेदभाव आहे. तसेच एक अस्पृश्यतेची समस्या आहे. आमच्या लोकांना यातील अंतर समजून येत नाही. जातीची समस्या ही उच्च निचतेची समस्या आहे. अनटचॉबिलीची समस्या ही स्पृश्य- अस्पृश्यतेची समस्या आहे. उच्च निचतेचा भेदभाव ब्राह्मण सोडून सर्वांसोबत होत होता. काही वेळापूर्वी क्षत्रिय समूदायाच्या वक्त्यांनी सांगितले कि उच्च निचतेचा भेदभाव त्यांच्या सोबतही होत होता. ब्राह्मण त्यांच्यासोबतही भेदभाव करत होते.
ते पुढे म्हणाले कि आमच्या शिकलेल्या लोकांना शूद्र आणि अस्पृश्य यात काय अंतर आहे, हे समजून येत नाही. अनेक लोक शूद्रांनाच अस्पृश्य समजतात. शूद्र अस्पृश्य लोक नसून स्पृश्य लोक आहेत. महाराष्ट्रात मराठा, कुणबी आणि ओबीसी हे ब्राह्मण धर्मानुसार शूद्र लोक आहेत. परंतू ते अस्पृश्य लोक नाहीत. अस्पृश्य लोक वेगळे आहेत. शूद्रांचा चौथ्या वर्णात समावेश आहे. मात्र अस्पृश्य लोकांचा चौथ्या वर्णात समावेश नाही. शिक्षित लोकांना ही बाब माहित नाही. ते शूद्र आणि अस्पृशांना एकमेकांत घुसवतात. ही देखिल एक मोठी समस्या आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले कि आमच्या लोकांमध्ये जागृतीची एक मोठी समस्या आहे. ते यावर विचार करत नाहीत. म्हणून त्यांना सफलता मिळत नाही. आमच्या लोकांना ज्ञान तर दूरच माहितीचाही मोठा अभाव आहे. ज्ञान आणि माहिती यात अंतर आहे. हे देखिल अनेक शिक्षीत लोकांना समजत नाही. ज्या माहितीला यश मिळते. जी माहिती उपयोगात आणल्यानंतर सफलता मिळते त्याला ज्ञान म्हणतात. आमच्या लोकांकडे माहिती आहे, परंतू ती उपयोगात आणली जात नाही. अशा माहितीचे काय करायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वामन मेश्राम म्हणाले कि जर माहितीला शस्त्र मानले तर त्याचा वापर करण्यात योग्यपणा आहे. ते दाखण्यात योग्यपणा नाही. एक ज्ञान असते आणि एक माहिती असते, ही बाब आम्हाला समजून घ्यावी लागेल. ब्राह्मण लोकांनी जाणीवपूर्वक ब्राह्मण धर्माचा प्रचार हिंदू धर्म या नावाने केला. इंग्रज भारतात आल्यानंतर ब्राह्मणांना असे वाटले कि इतर लोकांनाही अधिकार मिळू शकतात. ही बाब लक्षात ठेवून ब्राह्मणांनी शूद्र आणि अस्पृश्य यांच्यात अंतर ठेवणे सुरू केले. मराठा आणि ओबीसी अस्पृश्य नाहीत. ब्राम्हण त्यांच्या घरी जेवण करत नव्हता. अस्पृशांच्या घरी तर नाहीच करत होता.
ते पुढे म्हणाले कि केवळ अस्पृश्य लोकचं असे माणतात कि त्यांच्यासोबत भेदभाव होतो. भारतीय संविधानानुसार ज्या अस्पृश्यांना एससी म्हटले जाते, त्यांच्यासोबतच भेदभाव होतो, ही चुकीची गोष्ट आहे. एससी लोकांसोबत अस्पृश्यतेचा भेदभाव होतो तर जे स्पृश्य लोक आहेत, त्यांच्यासोबतही भेदभाव होता. जर होत नसता तर ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत भेदभाव का केला? ते तर राजा होते. राजा असूनही ब्राह्मणांनी त्यांच्यासोबत भेदभाव केला. राजा असूनही छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी राजा मानण्यास नकार दिला. जेव्हा कि त्यांचे प्रशासन ब्राह्मणच चालवत होते आणि सर्व निर्णय तेच घेत होते. जेव्हा ते निर्णय घेत होते तेव्हा स्वाभाविक ते ब्राह्मणांच्या विरोधात निर्णय घेत नव्हते.
बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले कि या सर्व बाबी आमच्या शिकले सवरलेल्या लोकांना समजून येत नाही. त्यामुळे बहुसंख्याक लोकांची संघटना बनवण्यासाठी काम केले पाहिजे, असा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. हा विचार डोक्यात आला नाही तर आचरण कुठून होणार? प्रथम विचार येईल. त्यानंतर आचरण होईल. विचारच आला नाही तर आचरण कुठून होईल. आचरणचं झाले नाही तर विचार परिवर्तन कसे होईल? सर्वात अगोदर परिवर्तन विचारातून होते. विचार आचरणात आणावे लागते. आचरण समाज जिवणात करावे लागते. यानंतर समाज जिवनात परिवर्तन येते.
वामन मेश्राम म्हणाले कि हिंदू धर्म हा हिंदू धर्म नाही तर ब्राह्मण धर्म आहे. किती लोकांना हे माहित आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण कि जेव्हा आम्ही ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणतो तेव्हा आम्ही ब्राह्मण धर्माला वाचवण्याचे काम करतो. जर आम्ही ब्राह्मण धर्माला ब्राह्मण धर्म म्हटले तर ब्राह्मण आणि बहूजन वेगळा होईल. यासाठी आम्हाला सर्वात अगोदर ब्राह्मण आणि बहुजन यांना वेगळे करण्याची कला शिकावी लागेल. जर हे केले नाही तर बहुजनांना जागृत करण्याची, त्यांचे संघटना निर्माण करण्याची आणि संघटना निर्माण करून आंदोलन निर्माण करण्याची तसेच आंदोलनाला जनआंदोलनात परिवर्तीत करून त्याचा प्रयोग करण्याची कला कुठून येईल?
सर्वात अगोदर आपल्या डोक्यात परीवर्तन आणावे लागते. जर आपल्या डोक्यात परिवर्तन आणले नाही तर समाजात बदल कसा होईल? यासाठी सर्वात अगोदर आपल्या डोक्यात परिवर्तन आणावे लागते. यांनतरच समाजात परिवर्तन घडून येते. म्हणून धर्माच्या संदर्भात हिंदू धर्म हा हिंदू धर्म नाही आहे. हिंदू धर्म ब्राह्मण धर्म आहे. ब्राह्मण धर्म हा बहुजनांचा धर्म नाही. हा बहुजनांचा धर्म नाही ही समज आम्हाला आली ती सर्वांनाच आली पाहिजे. यासाठी याचा प्रचार प्रसार करावा लागेल आणि दुसर्यांना योग्य प्रकारे समजावावे लागेल.
दयानंद सरस्वती म्हणत होते कि हिंदू ही मुसलमानांनी दिलेली शिवी आहे. जर लोकांना हिंदू शब्दापासून वेगळे करायचे आहे आणि ब्राह्मण देखिल हिंदू शब्दाचा वापर करू शकणार नाही, यासाठी आमच्या लोकांना हुशारीने कला शिकावी लागेल. म्हणून सर्वात अगोदर हा प्रचार करा कि हिंदू ही मुसलमांनी दिलेली शिवी आहे, असा प्रचार केला तर आरएसएसचे लोक हिंदू शब्दाचा उच्चार करणे बंद करतील. कारण लोक म्हणतील कि ब्राह्मण लोक आम्हाला हिंदू म्हणून शिवी देत आहे. यामुळे ओबीसी समाजातील लोक ब्राह्मणांच्या विरोधात उभे ठाकतील आणि साडेतीन टक्के ब्राह्मण सेग्रिगेट होतील. दयानंद सरस्वती देखिल ब्राह्मण आहेत. तेव्हा एक ब्राह्मण दुसर्या ब्राह्मणाच्या म्हणण्याला नकार कसा देऊ शकतील? त्यांच्यासाठी ही बाब कठीण आहे.




