देश - विदेश

पेरियार रामस्वामी नायकर स्मृतीदिन

 ज्या देवाने माणसाला नीच आणि श्रेष्ठ जातीत जन्म दिला आणि ज्या धर्मशास्त्राने माणसाला नीच आणि श्रेष्ठ ठरवलं त्या देवाला आणि त्या धर्माला उध्वस्तचं केलं पाहीजे अशी गर्जना केली….
या पांढर्‍या दाढीवाल्या माणसाचं नाव होतं….
इरोड वेंकट रामस्वामी नायकर….
पुढे ते पेरीयार म्हणजे तमिळ भाषेत महात्मा म्हणुन ओळखले जाऊ लागले…

आपल्या भाषणात ते म्हणाले “तुमच्या हातात जर काठी असेल आणि तुम्हाला साप आणि ब्राह्मण दिसला तर आधी कोणाला मारायचे हे सांगायची गरज नाही. ब्राह्मण हा सापापेक्षा धूर्त असतो, त्याला आधी मारले पाहिजे.”

पेरीयार असं का म्हणाले….?

वेंकट रामास्वामी नायकर तामिळनाडूच्या इरोड शहरातील व्यापारी कुटुंबातील मुलगा.
पेरीयार २५ वर्षांचे असताना १९०४ मध्ये काशीला गेले होते. त्यावेळी मणिकर्णिका घाटावर वर्णव्यवस्थेनुसार नीच समजल्या जातींच्या लोकांचे, विधवा स्रियांचे आणि भिक्षेकर्यांचे अर्धे जळालेले मृतदेह चितेतुन बाहेर काढुन गंगेत फेकले जात होते हे चित्र पाहुन पेरीयार फारच अस्वस्थ झाले होते

अशातचं एके दिवशी दुपारी भुकेने व्याकुळ झालेले पेरीयार काशीमध्ये फिरत होते. जवळचं एकेठीकाणी मोफत जेवण दिले जात होते. पेरीयार तिथे गेले पण जेवण मोफत असलं तरी ते फक्त आणि फक्त गरीब ब्राह्मणांसाठी आहे असं त्यांना सांगण्यात आलं…
पेरियार यांनी ब्राह्मणासारखा पोशाख करुन आत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला.
परंतु संपुर्ण पोषाख ब्राम्हणासारखा असुनही पेरीयार यांच्या मिशांनी मात्र त्यांना साथ दिली नाही. कारण तामिळ ब्राह्मण मिशा ठेवत नसतं…..
त्यांची जात नीच ठरवुन मंदिरातल्या पहारेकऱ्याने त्यांना जोरात रस्त्यावर ढकलून दिले. ते एका फलकाजवळ पडले
आणि ज्या फलकासमोर ते पडले, त्या फलकामध्ये त्यांना त्यांच्याच एका जातीच्या व्यापाऱ्याने मंदिराला दान दिल्याचा उल्लेख दिसला..
या घटनेनंतर पेरीयार यांची देवावर जी काही श्रद्धा होती, ती पूर्णपणे नष्ट झाली. या घटनेने त्यांच्या मनावर खुप खोलवर परीणाम केला…. आणि त्यातुनचं एका विद्रोहाचा जन्म झाला…

यामुळेच वर्णाश्रम धर्म, हिंदू धर्माची जातिव्यवस्था उघड करणे. आणि धर्मामुळे छळल्या जाणारे सोशित जातींसाठी लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला..
अस्पृश्य, पीडित, लोकांना सन्मानाने जगण्याचा आणि समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला.
पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले….

तामिळनाडू किंवा तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये परतल्यानंतर राजगोपालाचारी यांनी पेरीयार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. पेरीयार यांनाही हेच हवं होतं. खादी, असहकार, व्यसनमुक्ती या काँग्रेसच्या सर्व कार्यात त्यांनी उडी घेतली.

१९१९ साली त्यांच्या इरोड येथील बागेत सुमारे ५०० ताडाची झाडे होती, ज्यापासून ताडी तयार केली जात होती. समाजातील व्यसन दूर करण्यासाठी पेरियार यांनी ती सर्व झाडे तोडली होती…

१९२४ मध्ये त्रावणकोर , वर्णव्यवस्थेनुसार जातीव्यवस्था पाळणार्या राज्यात, निर्दयी सामाजिक रूढी आणि प्रथा होत्या .
एझावा आणि पुलाया सारख्या खालच्या जातींना अपवित्र मानले जात होते आणि त्यांना उच्च जातींपासून दूर ठेवण्यासाठी विविध नियम बनवले गेले होते.
यामध्ये केवळ मंदिरात जाण्यावरच नव्हे तर मंदिरांच्या आजुबाजुच्या परीसरातल्या रस्त्यावरसुद्धा इतर जातींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती
या विरोधात केरळमध्ये आंदोलन झाले.
आंदोलन करणाऱ्या नेत्यांना राजाच्या आदेशानुसार अटक करण्यात आली आणि हा लढा पुढे नेण्यासाठी नेतृत्व नव्हते. त्यानंतर, आंदोलनाच्या नेत्यांनी पेरियार यांना या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले गेले
या निषेधाचे नेतृत्व करण्यासाठी पेरियार यांनी मद्रास प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि गांधींच्या आदेशाचे उल्लंघन करून ते केरळला गेले.

त्रावणकोरला पोहोचल्यावर त्याचे राजेशाही स्वागत करण्यात आले. पेरीयार तिथल्या राजाचे मित्र होते. तरीसुद्धा त्या राजाला विरोध करण्यासाठी ते तिथे गेले होते म्हणुन त्यांनी हे स्वागत स्वीकारण्यास नकार दिला.
त्यानी राजाच्या इच्छेविरूद्ध निषेधांमध्ये भाग घेतला, अखेरीस त्यांना अटक करण्यात आली आणि काही महिने तुरुंगवासही भोगावा लागला. वोईकाम आंदोलनात पेरीयार एकमेव सत्याग्रही होते ज्यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला…

त्रावणकोरच्या घटनेनंतर बेंकट यांची कीर्ती आणखी वाढली. राजवाड्यातील मंदिरातील उत्सव, त्या दिवशी ‘इजाव’ किंवा ब्राह्मणेतरांसाठी रस्ता पूर्णपणे बंद होता.
पेरियार नेतृत्व करत असतानाच काँग्रेसने कार्यक्रम आपल्या ताब्यात घेतला. आपल्या उग्र भाषणामुळे आणि तुरुंगवासामुळे पेरीयार यांना त्रावणकोर सोडण्याचा आदेश देण्यात आला. तो आदेश त्यांनी पाळला नाही.
शेवटी गांधीजी आणि डब्ल्यू.एच. पिट (त्रावणकोरचे पोलीस आयुक्त) यांच्यात सल्लामसलत झाल्यानंतर ३० नोव्हेंबर १९२५ रोजी वाईकोम सत्याग्रह अधिकृतपणे मागे घेण्यात आला .
सर्व कैद्यांना सोडण्यासाठी आणि रस्त्यांवर प्रवेश देण्यासाठी करार झाला. 1936 मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी स्वाक्षरी केली ,आणि ब्राह्मणेतर जातींच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली
त्रावणकोमध्ये या ब्राह्मणेतरांसाठी केलेल्या यशस्वी आंदोलनाची बातमी ‘यंग इंडिया’ या गांधीजींच्या वर्तमानपत्रात छापुन आली होती, परंतु त्यात पेरीयार यांचा उल्लेख नव्हता.

तिरुनलवेलीजवळ एक गुरुकुल आश्रम गांधीजीचे शिष्य चालवत होते
या आश्रमात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी खाण्याची व्यवस्था असल्याची माहिती पेरीयार यांना मिळाली. पेरीयार संतापले. तामिळनाडू काँग्रेसने त्या गुरुकुलला १० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसचे तत्कालीन सचिव असताना पेरीयार यांनी ते पैसे रोखून धरले होते.
जातीआधारित आरक्षणाची काँग्रेस सभांमधली पेरियार यांची मागणी फेटाळण्यात आली. काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निधीवर चालणाऱ्या चेरनमादेवी गावातील वा. वे. सुब्रमण्यम अय्यर यांच्या गुरुकुल शाळेत भोजन देताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर असा भेदभाव करण्यात येत असल्याचं पेरियार यांना समजलं. पेरीयार संतापले..
ब्राह्मण असणाऱ्या अय्यर यांना असं न करण्याची विनंती पेरियार यांनी केली. मात्र पेरियार यांची विनंती अय्यर यांनी धुडकावली. काँग्रेसने अय्यर यांच्या शाळेला देण्यात येणारा निधी पुरवठा थांबवावा, अशी त्यांची मागणीही मान्य करण्यात आली नाही. दोन्ही आघाड्यांवर अपयश आल्यानं पेरियार यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला…यानंतर पेरीयार यांचे गांधींच्या पक्षाशी असलेले नाते कायमचे तुटले.
आणि ते जस्टिस पार्टीकडे वळाले…

पेरियार यांचा नास्तिकवाद हा खरे तर जातिवाद आणि पितृसत्ता यांच्यावर केलेला हल्ला होता. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंटल स्टडीजचे समाजशास्त्रज्ञ ए.आर. बेंकटाचलपथी एकदा म्हणाले होते, “तुम्ही नास्तिकता हा पेरियारचा मुख्य मुद्दा मानणे चुकीचे ठरेल. तेव्हा तामिळनाडूच्या समाजात नवजागरण नव्हते. ब्राह्मण संख्येने कमी होते, परंतु जातीभेदाचा फायदा घेतला. बहुतेक नोकऱ्या त्यांच्या हातात आहेत. पेरियार यांना या समाजाचे लोकशाहीकरण करायचे होते.”
अनुसूचित जाती, जनजाती आणि दलितांनाही ब्राह्मणेतरांच्या बरोबरीने समान अधिकार मिळवुन देण्याची त्यांची भुमिका होती

काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी स्वाभिमान चळवळ सुरू केली ज्याचा उद्देश ब्राह्मणेतर लोकांमध्ये (ज्यांना ते द्रविड म्हणत होते) स्वाभिमान निर्माण करणे हे होते. नंतर ते दक्षिण भारतीय लिबरल फेडरेशनचे (जस्टिस पार्टी ) अध्यक्ष झाले….

पेरीयार यांनी बालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावं, यासाठी सातत्याने प्रयत्न केले…
मुलांना जन्म देण्याचं ओझं त्यांनी झुगारून द्यावं तसंच महिलांनी शिक्षण घ्यावं, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पेरियार यांच्या अनुयायांनी लग्न सोहळ्यातील रुढी बाजूला सारण्यासाठी प्रयत्न केले. लग्न झालेल्या महिलांना मंगळसूत्र परिधान करण्याची सक्ती नसावी यासाठी त्यांनी मोहीम आखली. महिलांच्या हक्कासाठी आयोजित परिषदेतच त्यांना पेरियार ही उपाधी मिळाली…

समाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव यांचं मूळ वैदिक हिंदू धर्मात आहे, असं पेरियार यांचं स्पष्ट मत होतं. वैदिक हिंदू धर्मात समाजाची रचना एका उतरंडीसारखी असून ब्राह्मण अव्वल स्थानी आहेत. त्यामुळे हो व्यवस्था त्यांनी नाकारली. या कल्पनेला भर देण्यार्या इश्वरवादाचा त्यांनी विरोध केला. आणि मानवतेशी निगडीत नास्तिकतेची भुमिका स्विकारली…

सच्ची रामायण हे पेरियार’ यांचे सर्वाधिक चर्चेत असलेले आणि वादग्रस्त पुस्तक ठरले… पेरियार रामायणाला एक राजकीय ग्रंथ मानत. ते म्हणत की दक्षिणेतील अनार्य लोकांवर उत्तरेतील आयांनी मिळवलेल्या विजयाला आणि वर्चस्वाला अधोरेखित करण्यासाठी रामायण लिहिले गेले. सोबतच ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांचे आणि स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व निर्माण करण्याचे हे एक साधन आहे असे ते मानत…
रामायणातील मूळ आशय उलगडण्यासाठी पेरियार यांनी वाल्मिकी रामायण’ आणि इतर राम कथांचे अनुवाद, जसे की कम रामायण, तुलसीदास रामायण’, ‘रामचरितमानस, चौद्ध रामायण’, ‘जैन रामायण इत्यादींचा जवळपास चालीस वर्षांहून अधिक काळ सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी रामायण पादीरंगल (रामायणातील पात्रे) या पुस्तकात रामायणाची टीकात्मक समीक्षा केली. हे पुस्तक १९४४ मध्ये तामिळ भाषेत प्रकाशित झाले होते.
त्याची इंग्रजी आवृत्ती १९५९साली ‘द रामायण: अ टू रीडिंग’ या नावाने प्रकाशित झाली. उत्तर भारतातील लोकप्रिय बहुजन कार्यकतें ललई सिंग यादव यांनी १९६८ साली हे पुस्तक हिंदीत सच्ची रामायण’ नावाने प्रकाशित केले. ९ डिसेंबर १९६९ रोजी तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने त्यावर बंदी घातली होती आणि यानंतर सर्व पुस्तके जप्त करण्यात आली होती..
या बंदीच्या आणि जप्तीच्या विरोधात ललई सिंग यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि खटला जिंकला. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. १६ सप्टेंबर १९७६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणावर उत्तर प्रदेश सरकार विरोधात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने निकाल दिला.
आज पेरीयार यांचे सच्ची रामायण आज सर्वत्र उपलब्ध आहे….. पेरीयार यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button