सामाजिक
लोकमान्य गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धाराम टाके यांची एकमताने निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : येथील लक्ष्मी मंडई जुना आडत बाजार येथील लोकमान्य गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी लोकमान्य उद्योग समूहाचे प्रमुख सिद्धाराम टाके यांची एकमताने निवड करण्यात आली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२५ गणेश उत्सव मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नूतन अध्यक्ष म्हणून सिद्धाराम टाके यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष गुंडू कांदे, आकाश विभुते, सचिव प्रज्वल गवंडी, आदर्श पडनुरे, खजिनदार संदेश उमराणीकर, महेश पाटील, कार्याध्यक्ष श्रीधर गुरव, बबलू कामनुरकर, धोंडाप्पा कुंभार, पूजा प्रमुख रुद्रया स्वामी, गोटू तारापुरे, विकास जकापुरे, लेझीम प्रमुख केदार महाशक्ती, आकाश पाटील, अशोक जाधव, रशीद खिस्तके, सौरभ स्वामी, यश कडगंची, किरण मोरे, अजय यारोळे, मिरवणूक प्रमुख शैलेश राठोड, नंहु कोरबू, बंटी राठोड, देविदास गवंडी, शिवराज जकापुरे, अंकुश चौगुले, सचिन शिंदे, प्रथमेश पवार, योगेश पवार, लखन झंपले, प्रशांत कानडे, तर अथर्वशीर्ष कार्यक्रमाकरिता प्रशांत शिंपी, सुनील दसले, दयानंद रोडगे, दत्ता कटारे, श्रीशैल जिडगे, श्रीकांत झिपरे आदींची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे यंदाचे १० वें वर्ष असून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे गणेशोत्सव साजरा होत असतो.



