अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट येथील बागेहळी रोडवरील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयात भारतीय बौद्ध महासभा शाखा अक्कलकोट यांच्यावतीने ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे जिल्हा संघटक सिद्धाराम घटकाबळे जिल्हा प्रवक्ते दिलीप कदम ,राजकुमार बनसोडे श्रीशैल शिवशरण अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे ,अनंत शिवशरण , शंभूदेव सुरवसे, भीमाशंकर घटकाबंळे शिवशंकर गुंजले दिलीपकुमार शिवशरण , उर्मिला राजकुमार बनसोडे पत्रकार राजेश जगताप स्वामीराव गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते जिल्हा प्रवक्ते दिलीप कदम यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच बहुजन समाज हा सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यांच्या त्यागामुळे बलिदानामुळेच बहुजन समाज , वंचित घटक ,मागासवर्गीय घटक हा शिक्षण सामाजिक राजकीय सांस्कृतिक आदींसह विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले जीवन हे बहुजन समाजासाठी तळागाळातील समाजासाठी, दीनदलित समाजासाठी वेचले आहे. त्यांच्या त्यागाला बहुजन समाजाने जागले पाहिजे.पुण्यातील कर्मठवाद्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा छळ केला.पण महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी न डगमगता बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाची द्वारे खुली केली. तसेच दीनदलितांच्यां विकासासाठी काम केले.





