राजकीय
भाजपाच्या हाती सत्ता दिल्यास अक्कलकोट , मैंदर्गी, दुधनी या शहराच्यां विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अक्कलकोट ( प्रतिनिधी )सचिन कल्याणशेट्टी हे आमदार झाल्यानंतर अक्कलकोट सह मैंदर्गी , दुधनी या ठिकाणी विकास कामे ही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आपल्या भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल ,भुयारी गटार असेल या योजना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पूर्ण केले आहेत. अक्कलकोटच्या बस स्थानकाच्या इमारतीसाठी २३ कोटी रुपये , अक्कलकोट शहराच्या विकासासाठी ३६९ कोटी रुपये , ७५ कोटी रुपये अमृत योजनेसाठी , ११४ कोटी रुपये रस्ते विकास कामासाठी , १६८ कोटी रुपये ड्रेनेजसाठी , तालुका न्यायालय इमारतीसाठी ६० कोटी रुपये , पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीसाठी निधी , वेगवेगळ्या मार्गासाठी ८६ कोटी रुपये ,देगाव एक्सप्रेस योजनेसाठी ३५० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी व्यवस्थितपणे वितरित करण्यासाठी भाजपाच्या हाती सत्ता असणे आवश्यक आहे. अक्कलकोट , मैंदर्गी आणि दुधनी या शहरांच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्या. भाजपाला सत्ता दिल्यास या शहरांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.अक्कलकोट शहरात रविवारी सकाळी नगरपालिका निवडणुक प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भाजपाचे अक्कलकोट , ‘ दुधनी , मैंदर्गी नपाचे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमत्री देवेद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे आयोजन मंगरुळे प्रशाला जवळील प्रांगणात केले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते .
व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे , आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार देवेंद्र कोठे , नगराध्यक्ष पदरचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी , अतुल मेळकुंदे ,अंजली बाजारमठ , मा . खा .जयसिध्देश्वर शिवाचार्य
महास्वामी , नगरसेवक पदाचे उमेदवार महेश इंगळे , उत्तम गायकवाड , अविनाश मडीखांबे , भिमराव उर्फ तम्मा शेळके , दिलीप सिध्दे ,शशिकांत चव्हाण माजी आमदार राजन पाटील , निलकंठ शिवाचार्य महास्वामी , अमोलराजे भोसले आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,अक्कलकोट च्या विकासासाठी मैंदर्गी , दुधनी नगरपालिकेच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. माझ्या कडे शहर बदलायची ब्लु प्रिंट आहे अक्कलकोट मैंदर्गी दुधनी तीनही नगरपालिकेमध्ये भाजपा चा नगराध्यक्ष व बहुमताने सत्ता दया शहराच्या विकासाकरिता परिवर्तनाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही .आम्ही आश्वासने पाळतो . लाडक्या बहिणीनां लखपती दिदी बनवायच आहे देवा भाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करील .अक्कलकोट दुधनी मैंदर्गी नगरपालिकेत भाजपाची बहुमताने सत्ता व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी , अतुल मेळकुंदे ,अंजली बाजारमठ यांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले .अक्कलकोट मैंदर्गी आणि दुधनी भाजपाची सत्ता आणणार आमदार सचिन कल्याण शेट्टी सध्याची निवडणूक ही विरोधकांनी लाभलेली निवडणूक आहे अनेक ठिकाणी विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षासह इतर पक्षांना उमेदवार मिळाले नाहीत अक्कलकोट नैसर्गिक दुधनी नगरपरिषद निवडणुकीत मतदार राजा हा विरोधकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अक्कलकोट शहरास मैंदर्गी दुधनी शहरात विकासाची मोठी कामे सुरू आहेत. रस्ते विकास ,पिण्याच्या पाण्याच्या योजना , ड्रेनेजची नवीन पाईपलाईन टाकणे या योजनांचे काम पूर्णत्वाकडे जात आहे अक्कलकोट मैदर्गी दुधनी शहराच्या विकासासाठी भाजपाची सत्ता असणे हे गरजेचे आहे या ठिकाणच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे सर्वच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आणणार असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
या सभेस नपा उमेदवार सुनंदा स्वामी ‘ कस्तुरा चौगुले लक्ष्मीकांत .धनशेट्टी , मुस्तफा गवंडी
मुस्तफा बळोरगी रेश्मा शेख
अविनाश मडीखांबे ‘ ‘ मंजना कामनूरकर रेणुका राठोड , ‘रमेश कापसे ,अपर्णा शिंदे , यशवंत धोंगडे
नवीद डांगे अमृता शिंदे शैला स्वामी ,महेश हिंडोळे स्नेहा खवळे ‘ , सद्दाम हुसेन शेरीकर . ,सोनाली शिंदे , देविदास कवटगी ‘ ,आरती गायकवड ‘ ‘ ‘ . ऋतुराज राठोड , भागुबाई कुंभार अल्फिया कोरबू सह मैंदर्गी ‘ दुधनी नपा चे भारतीय जनता पार्टी चे उमेदवार , पदाधिकारी , कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार भाजपा मंडल अध्यक्ष माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी मानले.






