शैक्षणिक

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या अजिंक्य दळवी याची राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

 

करमाळा ( प्रतिनिधी ) – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा अजिंक्य दळवी याची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धसाठी निवड झाली .महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या वतीने आयोजित पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धा या राजीव गांधी द स्टेडियम सोलापूर या ठिकाणी दिनांक ९/११/२०२५ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील खेळाडू कु. अजिंक्य लक्ष्मण दळवी याने तलवारबाजीच्या “सेबर” या प्रकारामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तलावाची स्पर्धेसाठी निवड झाली. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख प्रा. रामकुमार काळे, नागनाथ बोळगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव .विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button