ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भालेराव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर )
गेल्या अनेक वर्षापासून समाजाप्रती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समाजातील विविध घटकांना योग्य ती दिशा देत मार्गदर्शन, भरीव मदत व सन्मान करून अखंडितपणे आपली समाजसेवा कार्यरत ठेवली असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र महाजन भालेराव यांना समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
नायगाव येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र महाजन भालेराव यांचा मुळातच सामाजिक पिंड असून ते यापूर्वी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ अर्थात लसाकम या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत तर स्व.खा. वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भालेराव यांच्या पत्नी सौ.ललिताताई रवींद्र भालेराव ह्या नायगाव पंचायत समितीच्या प्रथम सभापती म्हणून पदावर विराजमान झाल्यानंतर आपली प्रमाणिकपणे सेवा त्यांनी बजावली,रवींद्र भालेराव यांच्या सर्व सामाजीक कार्यांचा आढावा घेऊन नांदेड येथील मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माय डी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख पद्माकर पाटील सावंत,गणेश तादलापूरकर,श्री अनंतवाड, चंद्रकांत महाजन,इंजी.प्रशांत इंगोले,आयोजक शंकर सिंह ठाकुर,मारुती शिकारे या मान्यवरांच्या हस्ते रवींद्र भालेराव यांचा सह पत्नीक समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.



