महाराष्ट्र

ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे   निधन 

 कळंब येथे सायंकाळी ५ वाजता झाले अंत्यसंस्कार
धाराशिव – ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचं आज रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी  दुःखद निधन झाले. १९ जानेवारी १९४५ साली जन्मलेले  भास्कर चंदनशिव यांचे मृत्यू समयी वय  ८० वर्षाचे होते.  त्यांना गेल्या १५ दिवसापासून लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारसाठी दाखल केले होते. शेवटी त्यांना व्हिंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. आज रविवार रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची जीवन ज्योत मालवली. त्यांच्या पश्चात  पत्नी कमलाबाई, मुलगा कपिल, मुलगी मनिषा, दोन सुना, नाती, नातू, जावई, व मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार कळंब येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले.
ग्रामीण साहित्याचा दीपस्तंभ  
ग्रामीण साहित्याला तेजोमय करणारे, प्रख्यात लेखक म्हणून  प्रा. भास्कर चंदनशिव यांना ओळखले जात होते.  गेली अनेक वर्षे ते मराठी साहित्यात त्याचे लेखन उंच शिखरावर गेले. ग्रामीण जीवनाचा अनुभव, आणि वास्तव जगणे ते जगले.  गेली काही वर्षे ते आजारी होते. नुकतीच त्यांची तब्येत खालावली होती. लातूर येथे एका हॉस्पिटल मध्ये ते दाखल झाले होते. नंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. आज दुपारी त्यांचे  निधन झाले.   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button