महाराष्ट्र

मुंबई येथे बहुजन मुक्ति पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन

 

सोलापूर ( रमेश सुरवसे )दिपक शिंदे (प्रदेशाध्यक्ष -युवा संघटन बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र राज्य )यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह #सोलापूर येथे दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथे होणाऱ्या बहुजन मुक्ती पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशन बाबत महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

4 ऑक्टोबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थित राहतील असे सोलापूर जिल्हा युनिट तर्फे आश्वास्त करण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीचे ३रे राष्ट्रीय अधिवेशन दि: ४/ऑक्टोबर/२०२५ रोजी वार: शनिवार
वेळ: दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत ठिकाण: लोकमान्य तिलक क्रीडांगण,तिलक नगर चेंबूर, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन: बाबुराव माने (पूर्व आमदार शिवसेना,उद्धव ठाकरे महाराष्ट्र) हे करणार आहेत. या अधिवेशनास मुख्य अतिथी म्हणून प्रवेंद् प्रताप सिंह राष्ट्रीय प्रभारी ब.मु.पा नई दिल्ली,.दासराम नायक राष्ट्रीय अध्यक्ष ब.मु.पा नई दिल्ली, डॉ.अनिल माने राष्ट्रीय अध्यक्ष ब.मु.पा युवा संघटन नई दिल्ली, चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष रा.प.व.म नई दिल्ली, डॉ.मगन ससाने राष्ट्रीय अध्यक्ष इं.मे.प्रो.अ नई दिल्ली व इं.सय्यद मकसूद राष्ट्रीय अध्यक्ष रा.मु.मो नई दिल्ली तसेच या अधिवेशनाचे मुख्य मार्गदर्शक: .वामन मेश्राम  राष्ट्रीय संयोजक राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा नवी दिल्ली. हे आहेत.
या अधिवेशनाचे महत्त्वपूर्ण विषय आहेत.
विषय:१)मतदानाचा अधिकार हा शासक बनण्याचा आणि शासक बनवण्याचा अधिकार आहे, परंतु असंवैधानिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) मतदानाचा अधिकार रद्द करणे आणि SRI (सुधारणा) द्वारे SC/ST/OBC आणि अल्पसंख्याकांना मतदान यादीतून वगळणे हे शासक जातींचे षड्यंत्र आहे – एक गंभीर चर्चा! २) ओबीसींची जात-आधारित जनगणना न करणे, मंडल आयोग आणि सच्चर आयोग लागू न करणे, हिंदू आणि मुस्लिमांच्या नावाखाली आपापसात संघर्ष निर्माण करणे, ही सत्ताधारी वर्गाची षड्यंत्रकारी चाल आहे-एक चर्चा.
ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी हा विशाल राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. देशभरातून या अधिवेशनात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते,पदाधिकारी शुभचिंतक व हितचिंतक उपस्थित राहणार आहेत व तसेच सोलापूर जिल्ह्यामधून देखील बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबई येथे जाणार आहेत. याबाबतची माहिती ॲड. योगेश शिदगणे (बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश प्रवक्ता युवा संघटन ) यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button