राजकीय
अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करा , काँग्रेस पक्षाचे बोरगाव दे येथे जनआंदोलन

अक्कलकोट- ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा बाधित शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत करावी यासाठी तालुका काँग्रेस च्या वतीने अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरगांव(दे) येथे जलआंदोलन करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यात ढगफुटी होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.कुरनूर,हरणा व बोरी नदी ओसंडून वाहत आहेत त्यांच्या परिसरातील सर्व शेतामध्ये पाणी साचले आहे.शिरसी,शिरवळवाडी,बोरी-उमरगे येथील पुलावर पाणी आल्याने पूल खचले आहेत संगोळगी,सिंदखेड,मोट्याळ या गावांचे स्थलांतर होणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी असे पाटील यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे.
या जलआंदोलनच्या वेळी जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण जाधव,युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत कवडे,माजी सरपंच विलास सुरवसे,अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष मौला पठाण,युवक काँग्रेस सचिव रतन बिराजदार,अल्लाउद्दीन शेख,ज्ञानेश्वर पाटील,वैजनाथ गवी,राजू कोळी,अहमद पठाण,गंगाधर जिरगे,बाजीराव खरात,सरपंच माणिक धायगोडे,सतीश सलगरे,आयुब शेख व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.