सामाजिक
जेष्ठ पत्रकार सुभाष बिराजदार यांचे निधन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील बादोला येथील रहिवाशी सुभाष निंगप्पा बिराजदार (वय-७४) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते मगंरुळ हायस्कूल येथे उपमुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक होते.ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव होते.



