महाराष्ट्र

जालना येथील विराट सभेला हजारोच्या संख्येनी उपस्थित रहावे – कैलास चव्हाण 

 परतूर ( राम राठोड ) परतूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या युवा/युवती,पेराव्यातील माता- भगिनीं आणि नागरिकांनी 15 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर होण्याऱ्या सकल बंजारा समाजाकडून हैदराबाद गॅझेट (1920)नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या संदर्भात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय बंजारा परिषद युवा नेते कैलास चव्हाण यांनी केले आहे.
बंजारा माता -भगिनींनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत, भजनी मंडळी थाळी- नंगारा ई नागरिकांनी डपड्याच्या आवाजात आणि एक सुरात “”संत सेवालाल महाराज””च्या जय घोषनेने आणि बंजारा लेंगीने संपूर्ण जिल्हात आवाज गुंगला पाहिजे असे मोर्चेला आलेल्या नागरिकांनी करायला हवे.
पुढे त्यांनी या मोर्चेमध्ये सरकारने दिलेला आदेशाचे आणि कायद्याचे पालन,इतर समाजाबद्दल अपशब्द किंवा त्यांच्या मनाला लागणार असे उद्गार काढू नये,समाजाची बदनामी होणार नाही याचे पालन करावे,अनुचित प्रकार घडू नये,समाजाला गालबोट लागू नये,शांत आणि संयमाने हा मोर्चा निघायला पाहिजे.ह्या मोर्चेला पाहून इतर समाजाच्या शुभचिंतकानी किंवा लोकांनी असा शांत आणि संयमी मोर्चा या अगोदर कधीच झाला नाही अशी चर्चा जनसामान्यात आणि इतर लोकात मोर्चा झाल्यावर नंतर झाली पाहिजे.
शेवटी राष्ट्रीय बंजारा परिषद कडून कैलास चव्हाण यांनी या आरक्षणाच्या ऐतिहासिक क्षणाला आपला सहभाग नोंदवा असे आव्हान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button