सोलापूर

मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील बुद्ध विहार या ठिकाणी ड्रेनेज लाईनच पाणी मोठ्या प्रमाणात साचले

सोलापूर ( रमेश सुरवसे ) सोलापूरातील प्रभाग क्रमांक एक मधील दोन नंबर झोन मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर तरुण मंडळ येथील बुद्ध विहार या ठिकाणी ड्रेनेज लाईनच पाणी मोठ्या प्रमाणात साचलेल असून तसेच पावसामुळे पाणी प्रत्येक घरामध्ये जात आहे. नगरातील पंचशील चौक या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये ड्रेनेज व पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच नगरातील आम्रपाली चौक, रमानजली चौक हनुमान नगर, चमडा कारखाना, या ठिकाणी सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये पावसाचे किंवा ड्रेनेज पाणी मोठ्या प्रमाणात साचल्या असून नगरातील नागरिकांना ना त्रास होत आहे. तरी झोन अधिकारी यांना विनंती आहे तात्काळ माणसं पाठवून पाण्याचा प्रभाव कमी करावा जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. काँग्रेस पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष भीमराव  शिंदे यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी भीमराव  शिंदे यांनी आयुक्तांशी बोलून लवकरात लवकर नगराच काम चालू करण्याचा निर्णय घ्यायला लावतो असे नागरिकांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button