सामाजिक
हिळळी येथील भीमा नदीत उजनीचे पाणी आल्याने कर्नाटकचा रस्ता बंद

अक्कलकोट ( प्रतिनिधी )उजनी धरणातून व विर धरणातून सोडण्यात आलेले पाणी हिळ्ळी भिमा जलाशयात दाखल झाले असुन हिळ्ळी – गुबेवाड (कर्नाटक ) रस्ता बंद झाले आहे. भिमा नदी वरील पुल हा कर्नाटक राज्यातील हिंगणी ,तालुका इंडी- जि- विजयपूर या गावाला जोडणारा पूल पाण्यखाली आहे. या.पुलावरून वाहतूक बंद केली आहे.
सदरची ही वाहतूक ही दि:-२१/८/२०२५ पहाटे ४ पासून बंद करण्यात आली आहे.
पुलावरील पाण्यामुळे बंद रस्त्या व्यतिरिकत इतर रस्ता संबंधित गावाला उपलब्ध आहे. कर्नाटक वगळता इतर सर्व मार्ग खुले आहेत. भीमा नदीला पूर आल्याने कर्नाटक जाण्याचा संपर्क तुटला आहे. तसेच मौजे कलकर्जाळ येथील सिना नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने कलकर्जाळ ते कुडल दक्षिण सोलापूर कडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.
दरम्यान अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गा मध्ये वाढ करून आज दिनांक- २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता १,५१,६०० क्यूसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात असे आवाहन केले आहे.




