शैक्षणिक

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी

करमाळा : ( आयुब शेख ) . येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. पृथ्वीराज इंगळे व प्रा. धीरज पाचपिले हे लाभले होते .अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर बोलताना प्रा. इंगळे म्हणाले की अण्णाभाऊंच्या साहित्यावर साम्यवादाचा प्रभाव दिसतो आणि त्यातूनच त्यांचे साहित्य श्रमिक, कष्टकरी आणि दलितांसाठी निर्माण झाले आहे असे दिसून येते .
तसेच लोकमान्य टिळकांविषयी बोलताना प्रा. धीरज पाचपिले म्हणाले की लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक होते. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या, आगरकर आणि टिळक यांच्या राजकीय मतभेदाविषयी प्रा.पाचपिले यांनी सविस्तर मांडणी केली . कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल बी पाटील हे उपस्थित होते त्यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .अनिल साळुंखे व कॅ .संभाजी कीर्दाक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ .वंदना भाग्यवंत यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रुपाली थोरात यांनी केले व उपस्थिताचे आभार प्रा.दीपक सोनवणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button