इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत

करमाळा ( आयुब शेख )- येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील
शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ इयत्ता ११ कला / वाणिज्य /विज्ञान शाखेतील ५०% विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झाला आसून आज १ ऑगस्ट पासून कॉलेज नियमित सुरु झाले. त्यानिमित्त विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे प्राचार्य संभाजी किर्दाक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विज्ञान / वाणिज्य व कला शाखेतील सर्व उपस्थित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याचवेळी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मुलांचं स्वागत केले.यावेळी कनिष्ठ विभागातील विज्ञान/ वाणिज्य व कला शाखेतील सर्व प्राध्यापक व इयत्ता बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





