सामाजिक

अविनाश मडिखांबे सारख्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरा करायला अभिमान वाटतो- राजाभाऊ सरवदे

          अक्कलकोट( प्रतिनिधी )रिपाइं(आठवले गट)चे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे सारख्या कर्तबगार स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा साजरा करायला मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष .राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केली आहे. 
         अक्कलकोट भिमनगर येथील महात्मा बसवेश्वर मंदीर पटांगणात आयोजित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय देशमुख हे होते अक्कलकोट तालुक्यात अनेक निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे तो एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे असे प्रतिपादन देशमुख यांनी केले तर काम करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी यावेळी जनतेने खंबीर उभे राहून आशीर्वाद द्यावा अविनाशचे कार्यक्षेत्र आता तालुक्यापुरते मर्यादित राहिले नसून सर्व जाती धर्माला घेऊन चालणाऱ्या या कार्यकर्त्याला लवकरच अकरा तालुक्याची जबाबदारी देण्याचा पक्षाचा मानस आहे जनतेने मागे राहावे असे आवाहन रीपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी जनतेला केले कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालक प्रा.राहुल रुही यांनी केले तर सत्काराला कार्यकर्त्यांचे आभार मानताना अविनाश मडीखांबे म्हणाले की आजवर हजारो लोकांची कामे केली आहेत पुढे ही करू माझा कुणी शत्रू नाही ना विरोधक, मी सगळ्यांची कामे करतो जनतेने येणाऱ्या निवडणुकीत आशीर्वाद द्यावा 
         या प्रसंगी मनोज कल्याणशेट्टी, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय देशमुख,माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष अप्पू पराणे,मुस्लिम समाज अध्यक्ष एजाज मुत्तवली,नगरसेवक नागराज कुंभार,बंटी राठोड,सुनील खवळे,प्रहार संघटनेचे शहर अमर शिरसाठ,शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार,रासप अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्ता महाडकर,मैंदर्गीचे माजी नगराध्यक्ष किरण केसूर,विजय हर्डीकर,महेश शावरी,बसवराज सोनकांबळे,सुग़्रीव जेठिथोर,सुनील सिद्धे,मुन्ना राठौर,अमोल बिराजदार,निळकंठ हिंडोळे,शाम धुरी,बाळासाहेब मोरे, विकी बाबा चौधरी, नन्नू कोरबू,संदीप मडिखांबे, शिलमनी बनसोडे, सैदप्पा झळकी, अप्पा भालेराव, अजय मुकणार, राजु भगळे,विजयकुमार बाळशंकर,बंडू काका मडिखांबे,कल्याणी घाटगे,श्रीकृष्ण सुतार,भारत सोनकांबळे,दत्ता मडिखांबे, अर्जुन साळे,चनवीर मडिखांबे,अंबादास बनसोडे ,स्वामी गायकवाड,बाळासाहेब मडिखांबे,शिवशरण शिंदे,शिवानंद मडिखांबे,सुरेश सोनकांबळे,पंकज मडिखांबे,अप्पू गायकवाड,सूरज सोनके,शिरवळ शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड यांच्या सह वेगवेगळ्या गावाहून आलेले कार्यकर्ते,नागरीकासह,महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button